Sudhir Mungantiwar on Mukhyamantri Ladki Bahin Yojana Next Installment : “आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचे पैसे देऊ असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. तसंच, जाहीरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे पात्र महिलांना दीड हजार रुपये न देता २१०० रुपये देऊ असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. परंतु, आता स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन झालेलं नाही. एकनाथ शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर महिनाही सरला आहे, मात्र पात्र महिलांच्या खात्यात लाडकी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेगळीच चर्चा रंगली आहे. या विधानावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले होते?

या मुलाखतीवेळी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू. महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण कराल का? कारण राष्ट्रवादीने (अजित पवार) म्हटलंय की हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू. महिलांना दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून, संकल्प पत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २,१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार? जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी रक्षाबंधनादिवशी दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
Ex PM Manmohan Singh Admitted To AIIMS In Delhi
Ex PM Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, AIIMS रुग्णालयात दाखल
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी

हेही वाचा >> Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका

सुधीर मुनगंटीवरांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“मला प्रश्न विचारला की योजना कधी सुरू होणार? मी म्हटलं की हा निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाईल. अर्थसंकल्पात त्याचा निधी दिला जाईल. भाऊबीज फार लांब होईल. रक्षाबंधनाला ही योजना सुरू झाली. त्यामुळे तेव्हापासून वाढीव रक्कम द्यायची की एक एप्रिलपासून द्यायची हे मंत्रिमंडळात ठरवलं जाईल, हे मी मांडलं”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Story img Loader