Ladki Bahin Yojana Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जाणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल २ कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात, असा सरकारचा अंदाज आहे. राज्य सरकार व सत्तेतील सर्व पक्ष (महायुती) राज्याच्या कानाकोपऱ्यात या योजनेचा प्रचार व प्रसार करू लागले आहेत. असं असलं तरी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या योजनेवर नाखूश होते असे दावे विरोधी पक्षांमधील काही नेत्यांनी केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in