Ladki Bahin Yojana December Installment : राज्यात निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये या योजनेतून पात्र महिलांना पैसे मिळणार नाहीत. परंतु, या संभाव्य परिस्थितीची जाणीव असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्रच दिले होते. आता, डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना डिसेंबरच्या सन्माननिधीबाबत आश्वासित केलं. ANI ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार जुलै महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपयांचा सन्माननिधी देण्यात आला. जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे पैसे आतापर्यंत देण्यात आले आहेत. या योजनेतील पात्र महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले आहेत. तर, आता निवडणुका लागल्याने या योजनेसाठी असलेला निधी थांबवण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू राहणार की नाही? अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वासित केलं आहे.
हेही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद झाली? आचारसंहितेमुळे पसरलेल्या अफवेनंतर महायुती सरकानं काय सांगितलं?
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकले नाही पाहिजेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्ये दिले. २० नोव्हेंबरला मतदान आहे. २३ नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत. कारण आमची नियत स्वच्छ आहे. कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही.”
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडीच कोटी महिलांचे अर्ज आले होते, त्यातील २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज मंजूर झालेत. तर २ लाख २० हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. तर, आता निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार सत्तेत आल्यास ही योजना कायमस्वरुपी सुरू राहणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. तसंच, महाविकास आघाडीने या योजनेतील रक्कम वाढवणार असल्याचं सांगितलं.
निवडणूक आयोगाने थांबवला निधी
आ
केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतर दि. १९ ऑक्टोबर रोजी ही योजना बंद होणार असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर सरकारकडून लागलीच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आले. अदिती तटकरे यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री एक्सवर पोस्ट करून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार” असे स्पष्टपणे म्हटले आहे.
ज