Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana Diwali Bonus : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, सरकारकडून आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही वृत्त पसरलं आहे. काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार असल्याचंही या वृत्तांमधून सांगण्यात आलंय. त्यामुळे हे वृत्त खरं आहे का? याबाबत खरंच शासननिर्णय झाला का? सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलीय हे आपण पाहुयात.

अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे. आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले. त्यामुळे आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील. मात्र, याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, सरकारकडून अजून अडीच हजार रुपये मिळणार असल्याचं वृत्तही काही वृत्तसंकेतस्थळांनी दिलं आहे. त्यामुळे अनेक महिला या अडीच हजार रुपयांची वाट पाहत आहेत. हे पैसे कधी मिळणार याबाबत या वृत्तांमध्ये काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला वर्गांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय.

slum Dharavi, House slum dwellers Dharavi,
धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे! शासनाकडून धोरण जाहीर
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
mahayuti ladki bahin yojana
निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडक्या बहिणींना’ सरकारची भावनिक साद
no action against officer found guilty in cow distribution scam
बहुचर्चित गायवाटप घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई नाहीच; लाभार्थी, कर्मचाऱ्यांचे पुन्हा जबाब…
court directly asked Maharashtra State Electricity Distribution Commissioner If there are rights then why not take decisions
अधिकार आहेत तर मग निर्णय का नाही घेत? न्यायालयाने थेटच विचारले…
anganwadi workers announce chakka jam protest on 1 october across maharashtra
राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
भविष्यात कोणतेही बदल नाही; सुधारित निवृत्तिवेतन योजनेबाबत राज्य शासनाची स्पष्ट भूमिका
भविष्यात कोणतेही बदल नाही; सुधारित निवृत्तिवेतन योजनेबाबत राज्य शासनाची स्पष्ट भूमिका

हेही वाचा >> Shyam Manav : “लाडकी बहीण योजना हलक्यात घेऊ नका, महायुतीतला हाकलायचं असल्यास…”, श्याम मानव यांचा मविआला सल्ला

लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही

दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी साधलेल्या संवादानुसार, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. बोनसबाबतचे वृत्त खोटं असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

तसंच, काही दिवासंपूर्वी मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र, याबाबतही कोणताच शासन निर्णय झालेला नाही. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक महिलांची फसवणूक होऊ शकते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनासंदर्भात अधिकृत माहिती घेण्याकरता सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खातरजमा करून घ्या. अन्यथा तुमचा आर्थिक फसवणूक होऊ शकते.