तुळजापूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशामुळेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ही फसवी योजना सत्ताधार्‍यांना धडा शिकवेल, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात आहे. मंगळवारी परंडा येथे झालेल्या सभेनंतर तुळजापूर शहरात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार राहुल मोटे, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, अशोक जगदाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष संजय पाटील-दूधगावकर, भारत जाधव, सक्षणा सलगर, मनीषा पाटील, आदित्य गोरे, बसवराज नारळकर, विकास लवंडे, मेहबूब पटेल आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
dcm devendra fadnavis praise obc community
भाजपच ओबीसींच्या पाठीशी!, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान
13 ex corporators left bjp in the pimpri chinchwad
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर

हेही वाचा – Supriya Sule : “भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह काय? सगळंच…”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

बुधवारी तुळजापूर शहरात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाल्यानंतर खासदार सुळे, कोल्हे व प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, व्यवहारात पैसा आणि नात्याला महत्त्वाचे स्थान असते. सरकारला पंधराशे रुपये देऊन नाते विकत घेता येते, असाच समज झाला आहे. लाडक्या बहिणीच्या फसव्या नात्याला महिलांनी बळी पडू नये. सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांनी या योजनेबद्दल जी भाषा वापरली, त्यामुळे ही योजना दोन महिनेच सरकार राबविणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेकवेळा सरसकट कर्जमाफी करून शेतकर्‍यांचा सातबारा कोरा केला. सरकारने दूध, कांदा, सोयाबीन, कापूस याला भाव न दिल्याने शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुका महत्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती पहायला मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून भरमसाठ पैशाचा वापर केला गेला. तरी देखील तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ५४ हजारांचे मताधिक्य महाविकास आघाडीला मिळाले. हे मताधिक्य विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “भ्रष्टाचार रोखल्यास बदलीची शिक्षा, महायुतीचा प्रामाणिक अधिकाऱ्यांना इशारा”, ‘त्या’ बदलीवरून विरोधक आक्रमक

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी, सरकारने कोव्हिड काळात काम केलेल्या ७४ हजार भगिनींचे अद्यापही मानधन दिलेले नाही. आता केवळ निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण ही फसवी योजना आणली. परंतु जनतेने ठरविले आहे, हे सरकार जाणार व राज्यात शिवस्वराज्य येणार. या शिवस्वराज्य यात्रा सभेस जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.