तुळजापूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशामुळेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत ही फसवी योजना सत्ताधार्यांना धडा शिकवेल, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात आहे. मंगळवारी परंडा येथे झालेल्या सभेनंतर तुळजापूर शहरात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार राहुल मोटे, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, अशोक जगदाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष संजय पाटील-दूधगावकर, भारत जाधव, सक्षणा सलगर, मनीषा पाटील, आदित्य गोरे, बसवराज नारळकर, विकास लवंडे, मेहबूब पटेल आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
बुधवारी तुळजापूर शहरात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाल्यानंतर खासदार सुळे, कोल्हे व प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, व्यवहारात पैसा आणि नात्याला महत्त्वाचे स्थान असते. सरकारला पंधराशे रुपये देऊन नाते विकत घेता येते, असाच समज झाला आहे. लाडक्या बहिणीच्या फसव्या नात्याला महिलांनी बळी पडू नये. सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांनी या योजनेबद्दल जी भाषा वापरली, त्यामुळे ही योजना दोन महिनेच सरकार राबविणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेकवेळा सरसकट कर्जमाफी करून शेतकर्यांचा सातबारा कोरा केला. सरकारने दूध, कांदा, सोयाबीन, कापूस याला भाव न दिल्याने शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुका महत्वाच्या आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती पहायला मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून भरमसाठ पैशाचा वापर केला गेला. तरी देखील तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ५४ हजारांचे मताधिक्य महाविकास आघाडीला मिळाले. हे मताधिक्य विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी, सरकारने कोव्हिड काळात काम केलेल्या ७४ हजार भगिनींचे अद्यापही मानधन दिलेले नाही. आता केवळ निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण ही फसवी योजना आणली. परंतु जनतेने ठरविले आहे, हे सरकार जाणार व राज्यात शिवस्वराज्य येणार. या शिवस्वराज्य यात्रा सभेस जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.