Maharashtra Election Results Impact on Ladki Bahin Yojana : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे.

जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात कार्यान्वित झाली. १५ ऑक्टोबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याकरता मुदत देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिला पात्र ठरल्या आहेत. तर २ लाख २० हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. तसंच, नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तत्कालीन महायुती सरकारने तत्काळ अधिसूचना काढून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आले. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये जमा झाले आहेत.

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!

दरम्यान, निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांंचा निधी निवडणूक आयोगाने रोखला होता. त्यामुळे ही योजना आता बंद होणार अशी चर्चा विरोधकांनी सुरू केली. परंतु, निवडणुका झाल्यानंतर महिलांना पैसे देण्यात येणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?

वृत्तसंस्था एएनआयला २ नोव्हेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नयेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले. २० नोव्हेंबरला मतदान आहे. २३ नोव्हेंबरला निकाल आहे. त्यामुळे डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत. कारण आमची नियत स्वच्छ आहे. कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाही.”

दीड हजार रुपये मिळणार की २१०० रुपये?

डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता पात्र महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. ही योजना सरकारसाठी गेम चेंजर ठरली. यंदा मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाली. तसंच, महिला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने महायुतीला फायदा झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न महिलावर्गाकडून विचारला जातोय. एवढंच नव्हे तर, पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून २१०० रुपये करण्यात आले आहेत. आता नव्या हप्त्याचे पैसे मिळताना जुन्या योजनेप्रमाणे १५०० रुपये देणार की वाढीव रकमेप्रमाणे २१०० रुपये देणार हाही प्रश्न विचारला जात आहे.

Story img Loader