Ladki Bahin Yojana Scrutiny : राज्यात निवडणुका संपल्यानंतर नंव सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारने लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे. काही लाभार्थी महिलांना सहा महिन्यांचे हप्ता एकत्रच जमा झाला आहे. परंतु, आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करून छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही, असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, “तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत; चारचाकी असलेल्या महिला अपात्र ठरतील; आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत; आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
हेही वाचा >> Suresh Dhas Meet CM : सुरेश धसांचं निवेदन अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, भेटीत नेमकं काय ठरलं?
जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. १२ लाख ८७ हजार बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले नव्हते. त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही. दोन कोटी ३४ लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी १५०० हजार रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते. डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली. आदिती तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी खातेवाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली.
१२ लाखांवर नवे लाभार्थी
आतापर्यंत एकदाही लाभ न मिळालेल्या १२ लाख ८७ हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. राज्यातील लाभार्थी बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळाले.
© IE Online Media Services (P) Ltd