Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना होणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत लाखो महिला पात्र ठरल्या आहेत. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता काही महिलांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदतही वाढवली होती. आता या योजनेबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आता महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj looted Surat: छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती? राष्ट्रवादी – भाजपामध्ये ‘खंडणी’ शब्दावरून जुंपली

यापुढे फक्त आंगणवाडी सेविकांकडेच अर्ज करता येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शासन निर्णयात काय म्हटलं आहे?

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अर्जाच्या प्रक्रियेसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२४ मध्येही या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी आधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager). आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आलं होतं. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladki bahin yojana update a major change in the application process of ladki bahin yojana gkt
Show comments