Ladaki Bahin Yojana : अबिदा अर्जुन बसवंत (७२)या गेल्या ४० वर्षांपासून पुण्यातील धायरी आणि कोथरूड या भागात कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतात. पण त्यांच्या खालवत चाललेल्या प्रकृतीमुळे त्यांना हे काम पुढे सुरू ठेवणे कठीण जात आहे. अशात महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजणा सुरू केली आहे, यामुळे बसवंत यांना या योजनेतून मदतीची अपेक्षा आहे. त्यांनी या योजनेच्या लाभ घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांना तो मिळाला नाही, यासाठी त्यांचे वय कारणीभूत ठरले. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी घालून दिलेल्या पात्रतेच्या अटींमध्ये त्यांचे वय बसत नाही.

बसवंत यांचा मुलगा एका अॅपच्या माध्यमातून फूड डिलीव्हरी करणाऱ्या कंपनीत गिग वर्कर म्हणून काम करतो, पण त्याचा अपघात झाल्याने तो तीन महिन्यांपासून अंथरुणावर पडून आहे. अशा परिस्थितीत बसवंत यांनी योजनेचा लाभ मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “मला सांगण्यात आलं की, मला माझ्या वयामुळे बाद करण्यात आलं”.

Aditi Tatkare OnLadki Bahin Yojana January Installment Date in Marathi
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजनेचं आश्वासन महायुती कसं निभावणार? सत्ता स्थापनेनंतर महिनाभरातच का प्रश्न उपस्थित होतायेत?
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
ajit pawar devendra fadnavis
“जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आयुष्यात कधीच अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही, कुणाची हिंमतही…”, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजाप रुपये देण्याची योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे,अशा महिलांना आर्थिक मदत दिली जाते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा मोठा फायदा झाला. महिलांनी त्यांच्या बाजूने भरभरून मतदान केले. दरम्यान आता सरकारने २४.३ दशलक्ष पात्र नसलेल्या लाभार्थ्यांची नावे या योजनेतून काढून टाकण्यासाठी छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बसवंत यांच्याप्रमाणे कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना या योजनेचा आणि छाननीचा काहीही फरक पडणार नाही. बसवंत यांच्या प्रमाणेच अन्नपूर्णा अत्तकारे (७०) या पर्वतीच्या पायथ्याला पानमळा झोपडपट्टीत राहातात. ही झोपडपट्टी माधूरी मिसाळ यांचा मतदारसंघ आहे आणि त्या राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आहेत.

अत्तकारे या अजूनही काम करतात, त्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात कारण त्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहेत. त्यांचा नवरा, मुलगा आणि मुलगी यांचे निधन झाले असून त्या आपल्या मतिमंद मुलाचीही काळजी घेतात. त्या म्हणाल्या की, “मी जर एक दिवस कामावर गेले नाही तर आम्हाला खायला मिळत नाही”.

लाडकी बहीण योजनेतून बसवंत आणि अत्तकारे या दोघींना वगळण्यात आले आहे. या दोघींनी सांगितलं की त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. “पुढच्या वेळी आईची मते मागू नका – तुमच्या पाठीशी तुमच्या बहिणी आहेत”, असे अत्तकारे म्हणल्या.

त्यांच्या कामाचा ताण बसवंत आणि अत्तकारे यांच्यावर पडत आहे. अत्तकारे यांनी सांगितलं की त्यांच्या कंबरेला आणि गुडघ्याभोवती बेल्ट बांधावा लागतो कारण त्यांना प्रचंड वेदना होतात. तर बसवंत यांनी सांगितलं की त्यांना त्वचेचे आजार आहेत, ज्यामुळे त्यांना सतत डॉक्टरांकडे जावे लागते.

विशेष बाबा म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ८,००० कचरा कामगारांपैकी १२०० हे ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ज्यांच्याकडून लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारने ६५ वर्षांची मर्यादा का घातली, असा प्रश्न विचारला जात आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याविरोधात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनही करण्यात आले होते. इतकेच नाही तर माधुरी मिसाळ यांची भेट घेण्यासाठी ते मुंबईला देखील गेले होते, मात्र याचा काही फायदा झाला नाही.

Story img Loader