रत्नागिरी: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेचा फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देवून राज्य शासनाने लाडक्या बहिणींची घोर निराशा केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ४ लाख १७ हजार लाडक्या बहीणी असून त्यातील काहीच बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आला आला आहे. इतर बहिणी आजही खात्यात हप्ता येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. महिला दिनीच  शासनाकडून आपली फसवणूक झाल्याने लाडक्या बहिणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी जिल्ह्यातील बहिणींना  मागील वर्षातील डिसेंबर व जानेवारीमधील हप्ता हा दोन्ही महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात देण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे महिनाअखेर जमा होईल अशी आशा होती. मात्र  फेब्रुवारी महिन्याचा हप्ता   जमा न करता तो शनिवार ८ मार्चला फेब्रुवारी व मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रित जमा करणार असल्याचे महिला व बाळ कल्याण मंत्री आदिती तटकरे   यांनी जाहीर केले होते.  यामुळे संपुर्ण राज्यातील  लाडक्या बहिणीसह रत्नागिरी जिल्ह्यातील ४ लाख १७ हजार बहिणी  या दोन्ही हप्त्यांच्या प्रतिक्षेत होत्या. मात्र त्यांची ऐन जागतिक महिला दिनाच्याच दिवशी राज्य शासनाकडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे रत्नागिरीतील काही बहिणींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ४ लाख १७ हजार लाभार्थी महिलांना महिन्याला सुमारे ६१ कोटी रुपये वाटप करण्यात येते. यावेळी या महिला फेब्रुवारीचा  हप्ता  खात्यात अद्याप जमा न झाल्याने संभ्रमावस्थेत होत्या. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने याचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना हा हप्ता देण्यात आला नाही. मार्च महीन्यात दोन्हीचे हप्ते एकत्रित देण्याचे शासनाने जाहीर केल्यावर लाडकी बहीणींना दिलासा मिळाला होता.  मात्र आता काही बहीणींना  हप्ता न आल्याने लाडकी बहीण योजनेचे नवीन  निकष लावण्यात आल्याने या निकषांनुसार  आपले नाव कमी झाले की काय? अशीही चिंता अनेक लाडक्या बहिणींना लागून राहिली आहे.

दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र नाहीच

आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार होता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते. ही रक्कम मार्च आठ तारखेपर्यत पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार होती. मात्र ती एकाच महिन्याची जमा झाल्याने लाडक्या बहीणी चांगल्याच नाराज झाल्या आहेत. तर काही बहीणीं खात्यात अद्याप एकही हप्ता जमा न झाल्याने लाडक्या बहिणी अजून प्रतिक्षेत आहेत.