शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलातील दुभाजकाला धडकून कार उलटल्याने युवती ठार, तर एक जण जखमी झाला.
शहरातील भद्रकाली परिसरातील काझीपुरा चौकीजवळ राहणारी ज्योती गजानन नवले (२८) ही युवती रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कॅप्टिव्हा कारमधून पाथर्डी फाटय़ाकडून नाशिककडे येत होती. स्प्लेंडर हॉलसमोर कार आली असता दुभाजकावर धडकली. त्यानंतर कार उलटी होऊन उड्डाणपुलाला असलेला कठडा तोडत बाजूला जाऊन आदळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डोक्याला मार लागल्याने डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. या अपघातात कैलास शहा हे जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader