नवसाला पावणारी, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक जत्रोत्सवाला प्रचंड गर्दी झाली. सुर्य आग ओकत असताना देखील भल्या मोठ्या संख्येने रांगात भक्तांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी राजकीय नेते, मंत्री देखील उपस्थित होते. भल्या पहाटे पाहूनच भाविकांची गर्दी झाली होती. कोकण रेल्वेने प्रवाशांची स्पेशल रेल्वे सोडून सोय केली होती. दरवर्षी पेक्षा यंदा जास्त भाविकांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
आज माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, मंत्री आशिष शेलार, खासदार अरविंद सावंत,मंत्री उदय सामंत,आमदार दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार रवींद्र चव्हाण,आमदार निलेश राणे, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक तसेच मुंबई सह राज्यभरातील भराडी मातेवर श्रध्दा असणारे भक्त आले होते. श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. आता उद्या जत्रेचा समारोप होणार आहे. आंगणे कुटुंबीयांचे दैवत असलेतरी नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व दूर देवीची महती पोहचली आहे. त्यामुळे भक्त आवर्जून दर्शनासाठी येतात. मुंबई,ठाणे, कल्याण महापालिका नगरसेवक आवर्जून दर्शनासाठी येतात. सकाळ पासून दहा रांगात देवीच्या दर्शनाची सोय आंगणे कुटुंबीयांनी केली होती.