रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे (नातू नगर) रस्ता या पर्यायी मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. गुरुवारी पहाटे या मार्गावर पुन्हा दरड कोसळल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

बुधवारी महाड परीसरात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे काही प्रामाणात माती रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीचा वापर करून रस्ता मोकळा केला होता. मात्र, गुरुवारी पहाटे पुन्हा त्याच ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. यामुळे महाड शहराचा विन्हेरे विभागाशी संपर्क तुटला आहे.

Story img Loader