माळशेज घाटात आज पहाटे दरड कोसळली. त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
दरड कोसळ्याने अहमदनगर- कल्याण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे, मुरबाडच्या दिशेने जाणारी वाहतूक म्हासामार्गे, तर नगरकडे जाणारी वाहतूक आळेफाटामार्गे वळविण्यात आली आहे. प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरू असून, लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
आणखी वाचा