विश्वास पवार

वाई:वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बुधवारी दुपारी दरड कोसळली. यामुळे पाचगणी महाबळेश्वरकडे  जाणारी येणारी वाहतूक ठप्प झाली.पसरणी घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दरड हटविण्याचे काम सुरू केले . सायंकाळ पर्यंत दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे उप अभियंता महेश गोंजारी यांनी सांगितले.घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाई पोलीस दाखल झाले होते.

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Pune Municipal Corporation cleanliness drive on pedestrian bridges Pune news
अडलेले ‘पाऊल’ पडले पुढे! पादचारी पूल आवश्यक ठिकाणीच; असलेल्या पुलांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Municipal Corporation takes action against 71 unauthorized stalls in Kolhapur news
कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी मोहीम
वाढवण-इगतपुरी द्रुतगती महामार्गाचे संरेखन निश्चित
Butibori bridge case, Butibori bridge case,
नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण

हेही वाचा >>> सांगली: पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीची आत्महत्या

वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बुधवारी दुपारी दत्त मंदिराच्या पुढे वाईहुन पाचगणीला जाण्याच्या मार्गावर रस्त्यावर भली मोठी दरड कोसळली.यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली.पाचगणी व वाई कडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या.मागील काही दिवसांपासून परिसरात हलका व मध्यम पाऊस सुरु आहे.सकाळ पासून जिल्ह्यात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली आहे. दुपार नंतर पावसाने विश्रांती घेतली . सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगरावरील माती सैल झाल्याने छोटे मोठे दगड आणि माती निसरडे झाले आहेत.त्यातून या मार्गावर दरड कोसळली. मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती.एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या वतीने दरड हटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.सायंकाळ पर्यंत दरड हटविण्यात आली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. दरवर्षी वाई पाचगणी महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस पडत असतो.मुसळधार पावसात दरडी  कोसळतात.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई येथील आयआयटीच्या अभियंत्यांकडून दरड कोसळू नये यासाठी उपाययोजना सुचविण्यास सांगितले आहे. दि १६ सप्टेंबर रोजी या अभियंत्यांकडून पाहणी करण्यात आली आहे.त्याबाबतचा अहवाल लवकरच प्राप्त होईल व पुढील कार्यवाही सुरु होईल असे उपअभियंता महेश गोजारी यांनी सांगितले.

Story img Loader