रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. माळीण आणि तळीये दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या घटनेने राज्य हादरलंय. रात्री ११-१२ च्या सुमारास इर्शाळवाडीत दरड कोसळून १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. एनडीआरएफ, पोलीस, जिल्हा प्रशासन, पनवेल आणि मुंबई महापालिकेची बचावपथकं रात्रीच इर्शाळवाडीत दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत २५ हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे. तसेच अनेक जखमी गावकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे. यासह बचावकार्यात एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

इर्शाळवाडी हे एक छोटंसं गाव असून या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. इर्शाळवाडी गाव इर्शाळगडाच्या पायथ्यापासून खूप उंचीवर आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. गावात पोहोचायला एका पायवाटेने जावं लागतं. हे तासभराचं अंतर असल्याने बचावकार्य धिम्या गतीने सुरू आहे.

इर्शाळवाडीत सुरू असलेल्या बचावकार्यात अनेक अडचणी येत आहे. हे गाव डोंगराच्या पायथ्यापासून उंचीवर आहे. गावापर्यंत पोहोचायला चांगला रस्ता नसल्यामुळे तिथे जेसीबीसारखी वाहनं आणि मोठी यंत्रसामग्री नेता येत नाहीये. त्यामुळे लहान-मोठी अवजारं वापरून बचावपथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत. एनडीआरएफच्या जवानांसह बचावपथकांना नेहमीची कुदळ आणि फावडं यांसारख्या लहान-मोठ्या अवजारांच्या मदतीने मातीचा ढिगारा उपसावा लागतोय.

इर्शाळवाडीकडे जाणारी पायवाट निसरडी आहे. त्यात मुसळधार पावसामुळे परिसरात खूप चिखल झाला आहे. त्यामुळे इर्शाळवाडी गावाकडे जाणं अवघड झालं आहे. पाऊस आणि धुक्यामुळे पुरेशी दृष्यमानता नाही, परिणामी मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर इर्शाळवाडीत नेता येत नाहीये. हेलिकॉप्टर तिथे नेण्यासाठी सज्ज आहे. परंतु दृष्यमानतेअभावी इर्शाळवाडीकडे नेता येत नसल्याची खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.