देशाचे ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने राज्याचे फार मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आमदार विजय औटी यांनी दिली.
औटी हे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्ताने मुंबई मुक्कामी असून मुंडे यांच्या निधनाबाबत भावना व्यक्त करताना ते म्हणाले, अलीकडच्या काळात साहेबांसोबत माझी अनेकदा चर्चा झाली. ते राज्यासाठी काय काय करणार होते ते आता केवळ चर्चेपुरतेच राहिले आहे. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्या पाठोपाठ गोपीनाथ मुंडे हेही गेल्याने राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. पारनेरचा कारखाना त्यांनी केवळ माझ्या शब्दाखातर चालविण्यास घेतला. नफ्याचा विचार न करता शेतकरी तसेच कामगारांचे हितच त्यांनी पाहिले. सन २००४ ते २००९ दरम्यान त्यांच्यासमवेत विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावता आल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा