प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. काही काळापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत होती. मात्र आता त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये आहेत.
काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलं.
लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची व न्यूमोनियाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहे.