Maharashtra Updates, 09 December 2022: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागाविषयी मांडलेल्या भूमिकांवर राज्यात सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात सत्ताधारी शिंदे गटासोबतच भाजपामधील काही आमदार-खासदारांनीही या विधानाचा निषेध केला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून रान उठवलेलं असताना आता यावर केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Latest Marathi Batmya Live, 09 December 2022: महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि मनसे नेते वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी मध्यस्ती केली आहे. नाराज असलेले मोरे यांच्याबरोबर अमित ठाकरे यांनी शुक्रवारी चर्चा केली. वसंत मोरे यांचे म्हणणे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर घालण्यात येणार असून राज ठाकरे यासंदर्भातील योग्य तो निर्णय घेणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या इतिसाहासात शहरातील सर्व मालमत्तांचे लाईट डिटेक्शन अॅन्ड रेंजिंग टेक्नॉलॉजी अर्थात लिडार सर्वेक्षण केले जात असून पालिकेच्या इतिहासात प्रथम सर्वच मालमत्ताचे सर्वेक्षण होणार आहे. मालमत्ता करक्षेत्रात न आलेल्या मालमत्तांचेही सर्वेक्षण होणार असून जमा होणाऱ्या मालमत्ता करामध्येही वाढ होणार आहे.
राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडचणीत आलेल्या उध्दव ठाकरे शिवसेनेची पुनर्बांधणी होण्यासाठी नव्या नेमणुका करत आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघात संघटकपदाची दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास माजी मंत्री दिलीप सोपल यांनी नकार दिला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे शिवसेनेला धक्का बसला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी शुक्रवारी इस्लामपुरमध्ये बंद पाळण्यात आला. बहुजन महापुरूष सन्मान कृती समितीच्यावतीने पुकारलेल्या इस्लामपूर बंदला नागरिकांनीही उत्स्फुर्त पाठिंबा दिल्याने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
चारित्र्यावरून संशय घेत त्रास देणाऱ्या पतीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीला अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १५ हजार रुपयांचा दंड देखील न्यायालयाने ठोठावला आहे. तेल्हारा शहरातील संभाजी चौक येथील रहिवासी मंगला रमेश हागे हिला पती रमेश ओंकार हागे (५०) हे चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत होते.
टॅक्सीचालकांना रात्री लुटणाऱ्या एका टोळीला नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून या टोळीने अनेक ठिकाणी टॅक्सीचालकांना लुटल्याचा पोलिसांना संशय आहे.
'सत्ता गेल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महाराष्ट्र तुटत असल्याचे दिसत आहे', असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला. केंद्राच्या माध्यमातून भाजपावाले महाराष्ट्र तोडत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला होता. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत फेरीवाले, बेकायदा बांधकामे, वाहतूक कोंडी, स्मार्ट सिटी प्रकल्पांची संथगती कामे हे सगळे विषय गंभीर होत चालले आहेत. प्रशासन याविषयी गंभीर नसल्याने या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी येथील जागरुक नागरिक फाऊंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱी यांनी पालिका मुख्यालयासमोर दोन स्वतंत्र धरणे आंदोलने सुरू केली आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अडसर ठरलेली मुंबई, पालघर आणि ठाणे येथील २१ हजार ९९७ खारफुटीची झाडे तोडण्यास नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली.
बेकायदा आणि विनापरवानगी चालणाऱ्या बाइक टॅक्सी उपयोजनवर (ॲप) बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा
श्रद्धा वालकर खून प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत असताना, आता श्रद्धाचे वडील विकास वालकर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यास पोहचले आहेत. श्रद्धाचा खून झाल्यानंतर फडणवीसांनी या घटनेचा सखोल तपास होईल आणि गुन्ह्यातील आरोपीला कठोर शिक्षा होईल, असं म्हटलं होतं. आता श्रद्धाला न्याय मिळावा यासाठी तिचे वडील फडणवीसांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. वाचा सविस्तर बातमी...
राज्याच्या गृहविभागातील भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करण्याबाबत तरतूद केली नाही, तर सध्या सुरू असलेल्या राज्यव्यापी पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा इशारा उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिला.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात विकास कामांसाठी निधी मिळत नाही म्हणून तणतण करत ३९ जण एकनाथ शिंदे यांच्या सोबत निघून गेले. आता किती, कोणाला निधी मिळाला. त्यातून काय कामे झाली. आपल्या लेकाच्या (मुलगा) मतदारसंघात रस्ते कामांसाठी हजार कोटीचा निधी आला आहे.
तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारची एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कोंडी झाली होती. आता एसटी पूर्वपदावर असतानाच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांची सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासह इतर मागणीसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबरपासून आमरण उपोषणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे पडळकर, खोत यांच्या संघटनेचाही शिंदे फडणवीस सरकारविरोधात संघर्ष अटळ दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग, नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. मात्र, मोदी यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले नागपूर मेट्रो टप्पा-२ आणि नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारकडून नागपूरला मोठी भेट मिळाली आहे.
गुजरात तर मोदींचेच होते, पण दिल्ली जिंकणे ही खरी कसोटी होती. तसेच हिमाचल प्रदेशचे म्हणावे लागेल. हिमाचल प्रदेशात भाजपाची सत्ता होती. तेथे आता काँग्रेसने विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवले आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले, पण त्यांचे आमदार फोडून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत भाजपा असेल तर ते अनैतिक आहे. अर्थात भाजपच्या राजकारणात सत्ता हेच सत्य असल्याने नैतिक व अनैतिकता वगैरे शब्द निरर्थक आहेत अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. एकंदरीत गुजरात विजयाने भाजप जल्लोष करीत आहे. ते यश सर्वश्री मोदी यांचे आहे, पण दिल्ली व हिमाचल प्रदेश भाजपने गमावले त्यावर कोणीच बोलत नाही. असे का? असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं विधान तसंच सीमावादाचा मुद्दा आणि राज्याबाहेर गेलेले प्रकल्प यासह विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी १७ डिसेंबरला मुंबईत भव्य मोर्चा काढणार आहे. अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र तोडण्याचे काम सुरू आहे अशी टीका केली. दरम्यान यावर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उदयनराजे राज्यपालांविरोधात आक्रमक, पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवलं पत्र
सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत बैठक पार पडली. यावेळी सीमाभागाविषयी खासदारांनी आपली भूमिका मोदींसमोर मांडली.
Latest Marathi Batmya Live, 09 December 2022: महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर