Marathi News Live Today: गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या नाराजीच्या अफवांमुळे राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे.
Maharashtra Political Live News Update: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
लोणावळा: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यावर सट्टा घेणाऱ्या पाच जणांवर लोणावळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक लॅपटाॅप, काही मोबाईल संच आणि दूरचित्रवाणी असा एक लाख ५७ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
पोलिसांचा पेहराव करून फिरणाऱ्या तोतया पोलिसाला पकडण्यात विलेपार्ले पोलिसांना पोलिसांना यश आले आहे. आरोपी कमांडोप्रमाणे टोपी, बूट व दुचाकीवर पोलिसांचे चिन्ह लावून हा तोतया फिरत होता.
पनवेल: राज्य सरकारने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धा २०२२ मध्ये पनवेल महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पुणे: पुणे शहराच्या विविध भागांमध्ये दुपारी तीन ते चार दरम्यान गारांसह पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यांसह तसेच काही प्रमाणात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.
पोलिसांचा पेहराव करून फिरणाऱ्या तोतया पोलिसाला पकडण्यात विलेपार्ले पोलिसांना पोलिसांना यश आले आहे. आरोपी कमांडोप्रमाणे टोपी, बूट व दुचाकीवर पोलिसांचे चिन्ह लावून हा तोतया फिरत होता. त्याच्याविरोधात तोतयागिरी केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनीच गुन्हा दाखल केला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुक च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक अत्रे ले आऊट येथील मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील आमदाराच्या वेगवेगळ्या बैठक होत असून पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील आमदाराची बैठक आटोपली असून दुपारी पश्चिम विदर्भाची बैठक सुरू झाली आहे.
नवी मुंबई: घणसोली येथील एका चौकडीने कोल्ड्रिंकचे पैसे मागणाऱ्या किराणा दुकानमालकास मारहाण करीत चाकूचे वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मारहाण आणि हत्येचा प्रयत्न या कलमांन्वये गुन्हा नोंद झाल्यावर पोलिसांनी चार आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे, तर एकावर उपचार सुरू आहेत.
नाशिक: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्यातंर्गत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली असतांना जिल्ह्यात किती प्रवेश झाले, याची माहिती संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींमुळे मिळण्यात अडथळा येत आहे.
धुळे – साक्री तालुक्यातील चिखलीपाडा येथील चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) तयार करण्याच्या कारखान्यातील आग आणि चार महिलांच्या मृत्यूप्रकरणी जैताणे गावात बुधवारी स्थानिक व्यापार्यांनी कडकडीत बंद पाळला. या घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा पाच झाला आहे.
नाशिक : शहरातील १५ पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक, त्यांच्याशी संबंधित महत्वाच्या व्यक्ती, कार्यालये या ठिकाणी आयकर विभागाने गुरूवारी सकाळी अचानक छापे टाकले. या कारवाईने बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या दिल्ली, मुंबई, पुणे येथील पथकासह अधिकारी, कर्मचारी असे ७५ हून अधिक जण या कारवाईत सामील आहेत.
जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार हे अस्तित्वात आले तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे. याच जितंजागतं उदाहरण आज अकोला ते नागपूरपर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली, त्यावरून पाहायला मिळालं आहे. त्यामुळे हा सैतानी राज्याचा उदय आहे – अमोल मिटकरी</p>
नागपूर: भारतीय रेल्वे विभागातील अभियांत्रिकी पदासाठी गुरुवारी नागपुरातील परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान गोंधळ झाला. पेपरसाठी सकाळी १०.३० वाजताची वेळ दिली असताना दुपारी १ वाजतापर्यंत विद्यार्थ्यांना पेपरचा देण्यात आला नाही.
भारतीय रेल्वे विभागातील अभियांत्रिकी पदासाठी गुरुवारी नागपुरातील परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान गोंधळ झाला. पेपरसाठी सकाळी १०.३० वाजताची वेळ दिली असताना दुपारी १ वाजतापर्यंत विद्यार्थ्यांना पेपरचा देण्यात आला नाही.
कच्चा आंबा कैरी , लोणचे किंवा पन्हे करण्यासाठी उपयोगात येतो. मात्र इथे असा आंबा आहे जो कच्चाच खाल्ला तर आनंद देतो. उद्योजक प्रदीप बजाज यांच्या घरी या आंब्याचे झाड आहे. विलुप्त होणाऱ्या जातीतील हे वाण असल्याचा दावा ते करतात. हा आंबा देशात कुठे असेल तर मला दाखवा,असे त्यांचे आव्हान आहे.
कल्याण – डोंबिवलीतील कोपर गावमध्ये एका महिलेकडे पैशाची मागणी करूनही ती पैसे देत नसल्याने संतप्त झालेल्या कोपरमधील एका तरुणाने या महिलेच्या घरात जाऊन तिचा गळा तारेने आवळून तिचा बारा वर्षांपूर्वी खून केला होता. या महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर. पी. पांडे यांनी एकाच गुन्ह्यात दोन १० वर्षांच्या आजन्म कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असताना कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगाव शेरी, चिंचवड, लवळे या भागांमध्ये इतर भागांच्या तुलनेत कमाल तापमानाचा पारा चढा आहे. तर या भागांच्या तुलनेत शिवाजीनगर, पाषाण येथील कमाल तापमान साधारणपणे दोन अंश सेल्सियस कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगाव शेरी, चिंचवड, लवळे या भागांमध्ये उष्णतेचे नागरी बेट (अर्बन हीट आयलंड) तयार झाले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने हवामान विभागाकडून अभ्यास करण्याचे नियोजन आहे.
बदलापूरः दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत असल्याने बदलापुरात एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या सहाय्याने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. १२ एप्रिल रोजी सेवानिवृत्त पोलीस आपल्या राहत्या घराबाहेरून बेपत्ता झाले होते. याप्रकरणातील आरोपीने मृत पोलिसाच्या खात्यातून विविध प्रकारे पैसेही वळते केल्याचे समोर आले आहे. त्यावरून आरोपीचा शोध लागला.
पुणे : मोटारचालकांकडे बतावणी करून मोटारीतील महागड्या वस्तू, रोकड, लॅपटाॅप लांबविणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्यांना कोरेगाव पार्क पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांच्या टोळीने शहरात आठ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्याकडून एक लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नगरः शहरात गेल्या काही महिन्यांपासून क्षुल्लक कारणावरून तणाव निर्माण करणाऱ्या घटना धूमसू लागल्या आहेत. त्याचे निमित्त करत बाजारपेठा बंदचे आवाहन केले जात आहे. विविध राजकीय, धार्मिक नेत्यांचे दौरे वातावरण तापवू लागले आहेत. शहरातील मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून पद्धतशीरपणे सुरू असल्याचे दिसत आहे.
सोलापूर : सोलापूरची विमानसेवा आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या कथित अडथळा असलेल्या चिमणी पाडकामाच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलन-प्रतिआंदोलन होण्याची सज्जता होत आहे. विमानसेवेच्या प्रश्नावर राजकीय व सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुणे : मिळकतकरातील चाळीस टक्क्यांची सवलत पूर्ववत ठेवण्याच्या निर्णयावर बुधवारी शिक्कामोर्तब झाल्याने एक मे पासून मिळकतकर देयकांचे वितरण करण्यात येणार आहे. मिळकतकर भरण्यासाठी ३० जून अंतिम मुदत असून या मुदतीमध्ये कर भरणा करणाऱ्या मिळकतकरधारकांना सर्वसाधारण करामध्ये किमान पाच ते कमाल दहा टक्क्यांची सवलत मिळणार आहे.
पुणे : मिळकतकरातील चाळीस टक्क्यांची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एक एप्रिल २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून ३१ मार्च २०२३ पर्यंतच्या फरकाच्या रकमेची वसुलीही माफ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
पुणे : अवकाळी पावसाचा लिंबांना फटका बसला आहे. सोलापूर, नगर जिल्ह्यातून होणारी लिंबांची आवक कमी झाली आहे. मध्यंतरी वातावरण बदलामुळे लिंबांच्या मागणीत घट झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने लिंबांच्या मागणीत पुन्हा वाढ हाेणार आहे.
पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातून सरलेल्या आर्थिक वर्षात तब्बल २२२४.८२ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३६९.८२ कोटींनी अधिक महसूल प्राप्त झाला आहे.
पुणे : जिल्ह्यातील चालू वर्षी मुदत संपणाऱ्या २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया पार पडली असून २५ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुंबईः गायक यो यो हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी अपहरण करून डांबून ठेवल्याची तक्रार इव्हेंट एजन्सीच्या मालकाने बीकेसी पोलिसांकडे केली. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून पुढील तपास सुरू आहे.
पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने (स्टेट लेव्हल टेक्निकल ॲडव्हायजरी कमिटी ) हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार झाला आहे.
पिंपरी : तुला कापड दुकान चालवायचे असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. हप्ता दिला नाही तर तुला दुकानासह जाळून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी देवून ५०० रुपये खंडणी उकळणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली.