Maharashtra Political News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर बारसू या ठिकाणी जो रिफायनरी प्रकल्प आणला जातो आहे त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राज्यात झडत आहेत. या प्रकल्पाला उद्धव ठाकरे गटाकडून विरोध होतो आहे. तर कुणाची सुपारी घेऊन हा विरोध करत आहात? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. दुसरीकडे बारसू प्रकल्पाविषयी राज ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. तसंच महाराष्ट्रात काय काय घडतं आहे? त्यावरही आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणार आहोत.

Live Updates

Maharashtra Live News Update Today| Maharashtra News Live Today : मुख्यमंत्री रजेवर असल्याच्या चर्चा, बारसूला विरोध आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी

महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

19:39 (IST) 26 Apr 2023
बुलढाणा: ७७ ग्रामपंचायतींचा नामांकन फलक दुसऱ्या दिवशीही कोराच!

बुलढाणा: येत्या १८ मे रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात ग्रामीण नेते व कार्यकर्त्यांचा निरुत्साह दिसून आला.

सविस्तर वाचा...

19:23 (IST) 26 Apr 2023
नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर आयकरचे छापे; तीन हजार कोटीहून अधिक बेहिशेबी व्यवहार उघड

नाशिक: शहर परिसरातील १५ पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांसह त्यांच्याशी संबंधित महत्वाच्या व्यक्ती, कार्यालये या ठिकाणी आयकर विभागाच्या वतीने छापे टाकण्यात आले.

सविस्तर वाचा...

18:59 (IST) 26 Apr 2023
चंद्रपूर: अमृत योजना नियाेजनशून्य! पाण्यासाठी हाहाकार, सव्वा चार लाख लोकसंख्येसाठी १२ टँकर

चंद्रपूर: ४३ ते ४४ अंश सेल्सिअसचे तापमान, कडक ऊन अशी परिस्थिती असताना शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. शहरातील १७ प्रभागात भीषण टंचाई आहे. सव्वा चार लाख लोकसंख्येच्या चंद्रपूर शहरात ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सविस्तर वाचा...

18:41 (IST) 26 Apr 2023
नाशिक: बलात्कार प्रकरणी विद्यार्थी सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखास अटक

नाशिक: महिलेस गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख किरण फडोळला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सविस्तर वाचा...

18:39 (IST) 26 Apr 2023
डोंबिवली: दारु पिण्याची हौस भागविण्यासाठी डोंबिवलीत वाहनांची चोरी

डोंबिवली: घराच्या परिसरात, रस्त्यावर उभी करुन ठेवलेली दुचाकी, रिक्षा रात्रीच्या वेळेत बनावट चावीने सुरू करुन चोरुन नेणाऱ्या दोन चोरट्यांना रामनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

सविस्तर वाचा...

18:32 (IST) 26 Apr 2023
डोंबिवलीतील अघोषित भारनियमन थांबविण्याची शिवसेनेची मागणी

डोंबिवली : कडक उन्हाळा सुरू झाल्यापासून डोंबिवली शहराच्या विविध भागात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा दोन ते तीन चार तास वीज पुरवठा पूर्ववत होत नसल्याने नागरिकांची हैराण होत आहे.

सविस्तर वाचा...

18:16 (IST) 26 Apr 2023
वाशीम: शेतकऱ्यांनी व्यथा मांडायच्या तरी कुणासमोर?, पालकमंत्री राठोड वाशीम जिल्ह्यात फिरकलेच नाही

वाशीम: जिल्ह्यात गत काही दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. २५ एप्रिल रोजी कारंजा व मानोरा तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे टोमॅटो, आंबा आणि उन्हाळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

सविस्तर वाचा...

17:58 (IST) 26 Apr 2023
खारघरहून परतलेल्याला मुरबाडच्या श्रीसेवकाचा मृत्यू; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांकडून दावा

मुरबाड तालुक्यातील तळेगाव येथे राहणारे रवींद्र चिंधू देशमुख (५०) यांचा बुधवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. देशमुख खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते. तेथून परतल्यावर देशमुख यांना उष्माघाताचा त्रास झाला. उष्माघातामुळेच देशमुख यांचा मृत्यू झाल्याचा दावा देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

17:13 (IST) 26 Apr 2023
डहाणू : मेंढवण येथे कार वाहून नेणाऱ्या कंटेनरला आग

डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात कडून मुंबईच्या दिशेला मारुती सुझुकी कंपनीची वाहने घेऊन निघालेल्या कंटेनरला अचानक आग लागल्यामुळे कंटेनरसह आतमधील वाहने जळून मोठा अपघात झाला आहे.

सविस्तर वाचा...

16:55 (IST) 26 Apr 2023
पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय आठ दिवस पुढे ढकलला

पुणे : यंदा मोसमी पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा प्रस्ताव महापालिकेकडून सादर करण्यात आला होता.

वाचा सविस्तर...

16:55 (IST) 26 Apr 2023
पुणे: आता ग्रामपंचायत स्तरावरून हवामानाच्या नोंदी; भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांची माहिती

पुणे: देशातील हवामानाचा अंदाज अचूकतेने वर्तवण्यासाठी आता पर्जन्यमान, हवामानाच्या नोंदी देशभरात ग्रामपंचायत स्तरावरून घेतल्या जाणार आहेत. ग्रामविकास मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे.

सविस्तर वाचा...

16:44 (IST) 26 Apr 2023
नाशिक: फसवणूक टाळण्यासाठी सायबर दूत उपक्रम; शहर पोलीस सायबर शाखेचा पुढाकार

नाशिक: समाज माध्यमांत रमलेल्या लोकांच्या बेसावधतेचा फायदा घेत अनेकांची इ माध्यमातून आर्थिक, शारीरिक फसवणूक होत आहे. ही गुन्हेगारी थांबविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

सविस्तर वाचा...

16:33 (IST) 26 Apr 2023
सातारा: सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाई: मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये असे मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथे त्यांच्या दरे (महाबळेश्वर) गावी आहेत.

वाचा सविस्तर...

16:12 (IST) 26 Apr 2023
शनिवारी नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

नाशिक : महावितरण कंपनी शनिवारी वीज उपकेंद्र आणि मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती तसेच पावसाळापूर्व कामे करणार असल्याने या दिवशी महानगरपालिकेच्या गंगापूर आणि मुकणे धरणातील उपसा केंद्रांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे.

वाचा सविस्तर...

15:44 (IST) 26 Apr 2023
लग्नपत्रिका वाटून घरी परतणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू; मोताळा तालुक्यातील दुर्देवी घटना

बुलढाणा: दोन दिवसांवर मुलीचे लग्न आले असल्याने लग्न पत्रिका वाटून घरी परतणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू झाला. मोताळा तालुक्यातील मूर्ती फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. यामुळे मृतकच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वाचा सविस्तर...

15:37 (IST) 26 Apr 2023
एकाच पक्षाचे गट-तट बारसू प्रकल्पाच्या मुद्यावर आमने-सामने

कोकणात प्रकल्पाला विरोध, हा प्रकार तसा नवीन नसला तरीही मूळचे एकाच पक्षातील गट-तट एखाद्या प्रकल्पाच्या मुद्यावर आमने-सामने उभे ठाकतात तेव्हा त्यामागची वेगळीच राजकीय समीकरणे समोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथे प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या निमित्ताने हा वेगळा अनुभव येत आहे.

सविस्तर वाचा

15:31 (IST) 26 Apr 2023
नाशिक: होळकर पुलाखालील यांत्रिकी दरवाजाचे काम लवकरच; बंधाराही हटविणार; गोदावरीतील पाणी फुगवटा कमी करण्यासाठी निर्णय

नाशिक: गोदावरीवरील होळकर पुलाखालील प्रस्तावित यांत्रिकी दरवाजाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या कामास सुरूवात होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथील सिमेंट बंधारा काढण्यात येईल.

सविस्तर वाचा...

14:15 (IST) 26 Apr 2023
नाशिक: अनधिकृत नळजोडणीधारकांना अभय; जोडणी अधिकृत करण्याची मुभा; पाणीपट्टीचे उत्पन्न वाढविण्यासाठी धडपड

नाशिक: शहरात अनधिकृत नळ जोडण्या निदर्शनास येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पाणीपट्टीचे उत्पन्न वाढविण्यासाठी महानगरपालिकेने अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी एक मे पासून अभय योजना जाहीर केली आहे.

सविस्तर वाचा...

13:32 (IST) 26 Apr 2023
मुंबईः जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

मुंबईः ट्रॉम्बे येथील चिताह कॅम्प परिसरात नऊ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली. गंभीर बाब म्हणजे आरोपीला यापूर्वीही अशाच प्रकारच्या विनयभंगाच्या प्रकरणात अटक झाली होती. त्याप्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपीने पुन्हा विनयभंगाचा गुन्हा केला.

सविस्तर वाचा...

12:56 (IST) 26 Apr 2023
बुलढाणा: ‘एमपीएससी’ची संयुक्त पूर्वपरीक्षा रद्द होण्याच्या भीतीने दहा हजार उमेदवार घायकुतीला!; संभ्रमातच तयारी सुरू

बुलढाणा: करिअरच नव्हे तर जीवनातील निर्णायक वळण व खडतर समजली जाणारी राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा यंदा विचित्र व गंभीर पार्श्वभूमीवर पार पडत आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील दहा हजार उमेदवार परीक्षा होणार आहे की नाही? अशी शंका मनात ठेवूनच तयारीवर अंतिम फिरवत आहे.

सविस्तर वाचा...

12:43 (IST) 26 Apr 2023
नागपूर: ‘सीईटी’ सेलचं चाललंय काय? परीक्षेच्या ओळखपत्रावर आजची तारीख, पेपर कालच घेतला…

नागपूर: नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ओळखपत्राचा गोंधळ समोर आला होता. त्यानंतर आता राज्य सामायिक परीक्षा म्हणजे सीईटी सेलने नवीन गोंधळ केला आहे.

सविस्तर वाचा...

12:38 (IST) 26 Apr 2023
‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ’ या नितीशकुमार यांच्या प्रतिमेला तडा

कधी भाजप तर कधी लालूप्रसाद यादव यांच्याशी युती करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजकीय विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच एकेकाळी गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिमेला बिहार सरकारच्या नव्या निर्णयामुळे तडा गेला आहे.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 26 Apr 2023
छत्तीसगड, झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गोंदिया : बलरामपूर (छत्तीसगड) जिल्ह्यातील सामरी पोलीस स्टेशन परिसरात आणि लगतच्या झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांनी बलरामपूरचे पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांच्यासमोर २५ एप्रिल, मंगळवारी आत्मसमर्पण केले.

वाचा सविस्तर...

12:12 (IST) 26 Apr 2023
कल्याणमध्ये मनसेला खिंडार, शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात सामील

मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत नसलेली विचारणा, पक्षाकडून जनहिताचे कार्यक्रम राबविण्यासाठी होत नसलेले मार्गदर्शन आणि स्थानिक नेतृत्वाकडून सतत मिळणारी उपेक्षितपणाची वागणूक, या सगळ्या प्रकाराला कंटाळून कल्याणमधील मनसेच्या महिला, पुरूष शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला.

सविस्तर वाचा

12:09 (IST) 26 Apr 2023
कल्याण: शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंत सम-विषम तारखेला वाहनतळाची सुविधा

कल्याण: शिळफाटा रस्त्यावर आणि निळजे रेल्वे स्थानक परिसरात कोठेही प्रशस्त वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहतूक विभागाने लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सम, विषम तारखेला वाहन चालकांना वाहने उभी करण्यासाठी मोकळीक दिली आहे.

सविस्तर वाचा...

12:06 (IST) 26 Apr 2023
“…पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही!”, चंद्रकांत पाटलांचे विधान

पुणे शहर आणि जिल्ह्यातील पाण्याबाबतचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान केले. ‘पाणी सोडा म्हणून माझ्यावर दबाव असतो. पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही. त्यासाठी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो,’ असे पाटील यांनी सांगितले. 

सविस्तर वाचा

11:51 (IST) 26 Apr 2023
पुणे : एकतर्फी प्रेमातून युवतीची दुचाकी पेटवली, तरूण अटकेत

श्रीराम घाडगे (रा. वाघोली, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी घाडगे याच्या साथीदाराच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत युवतीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती आणि आरोपी घाडगे एकाच महाविद्यालयात शिकत आहेेत.

सविस्तर वाचा

11:24 (IST) 26 Apr 2023
गडचिरोली: पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र; वनरक्षकासह सात जण अटकेत

गडचिरोली: जिल्हा पोलीस दलाने घेतलेल्या पोलीस भरतीत बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांद्वारे आरक्षणाचा लाभ घेऊन भरती झालेल्या दोन पोलीस शिपायांसह तात्पुरत्या यादीत निवड झालेल्या तीन उमेदवारांना २२ एप्रिलला अटक झाली.

सविस्तर वाचा...

11:23 (IST) 26 Apr 2023
चंद्रपूर: जन्मजात हृदयरोग व विविध आजार असलेल्या ६ हजार बालकांवर माेफत शस्त्रक्रिया

चंद्रपूर: जन्मताच बालकांमध्ये दोष, शारिरीक कमतरता, रोग, विकासातील विलंब आणि अपंगत्व, हदयरोग असलेल्या बालकांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम वरदान ठरत आहे.

सविस्तर वाचा...

11:12 (IST) 26 Apr 2023
मुंबईः मुलीला मारून पित्याची आत्महत्या

लालबाग येथे ४२ वर्षीय पित्याने मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. भूपेश आत्माराम पवार(४२) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते गणेश गल्ली येथील विमावाला इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबासोबत राहत होते.

सविस्तर वाचा

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis

बारसू प्रकल्पावरून सध्या विविध आरोपांच्या फैरी झडत आहेत. तसंच यावरून राजकारण रंगलं आहे.

Story img Loader