Maharashtra Political News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तर बारसू या ठिकाणी जो रिफायनरी प्रकल्प आणला जातो आहे त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी राज्यात झडत आहेत. या प्रकल्पाला उद्धव ठाकरे गटाकडून विरोध होतो आहे. तर कुणाची सुपारी घेऊन हा विरोध करत आहात? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. दुसरीकडे बारसू प्रकल्पाविषयी राज ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. तसंच महाराष्ट्रात काय काय घडतं आहे? त्यावरही आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणार आहोत.

Live Updates

Maharashtra Live News Update Today| Maharashtra News Live Today : मुख्यमंत्री रजेवर असल्याच्या चर्चा, बारसूला विरोध आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी

महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

10:56 (IST) 26 Apr 2023
पुणे : रॅप प्रकरणाबाबत राज्यपालांनी विद्यापीठाकडून अहवाल मागवला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप गाणे चित्रीत झाल्याच्या प्रकाराची दखल राज्यपालांकडून घेण्यात आली आहे. राज्यपालांनी या प्रकरणाबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचा आदेश राज्यपाल कार्यालयाकडून विद्यापीठाला देण्यात आला.

सविस्तर वाचा

10:50 (IST) 26 Apr 2023
पुणे, सातारा जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू

पुणे महसूल विभागातील केवळ पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांतच एप्रिलअखेरीस टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. उर्वरित सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत अद्याप टँकरची गरज भासलेली नाही. त्यामुळे यंदा पुणे विभागात पाण्याची स्थिती चांगली असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

सविस्तर वाचा

10:49 (IST) 26 Apr 2023
पुणे : अवकाळी नुकसानीपोटी ७० लाख ६९ हजारांची मदत

जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला ७० लाख ६९ हजार ५७० रुपयांची मदत मंजूर झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून, संबंधितांच्या थेट बँक खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे.

सविस्तर वाचा

10:48 (IST) 26 Apr 2023
सांगली भाजपमध्ये खासदारांच्या विरोधात नाराजीचा सूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सांगली दौर्‍यामध्ये झालेल्या भाजपच्या जिल्हा सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या गैरहजेरीत नाराजीचा सूर आळवला गेला. त्यातून भाजपमध्येही सर्व काही अलबेल नसल्याचा संदेश गेला आहे.

सविस्तर वाचा

10:47 (IST) 26 Apr 2023
पिंपरी-चिंचवड शहराचे विद्रुपीकरण करणारे जाहिरात फलक काढा, श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे एकही बेकायदा लोखंडी जाहिरात फलक (होर्डिंग) उभारु देऊ नका, सर्व फलकांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट)करावे. शहराचे विद्रुपीकरण  करणारे फलक तत्काळ काढण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.

सविस्तर वाचा

बारसू प्रकल्पावरून सध्या विविध आरोपांच्या फैरी झडत आहेत. तसंच यावरून राजकारण रंगलं आहे.