जालना/ मुंबई/ पुणे/ छत्रपती संभाजीनगर : Jalna Lathi Charge in Maratha Reservation Protest जालना जिल्ह्यात पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्याच्या अनेक जिल्ह्यांत शनिवारी उमटले. राज्य सरकारच्या विरोधात रास्ता रोको, निषेध मोर्चे, बंद अशी आंदोलने करण्यात आली. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात करण्यात आलेल्या ‘रास्ता रोको’ला हिंसक वळण लागले. तेथे पोलिसांनी पुन्हा लाठीमार केला. 

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी शुक्रवारी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या निषेधार्थ जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. त्याला हिंसक वळण लागले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या आणि रबरी गोळय़ाही झाडल्या. जमावाच्या दगडफेकीत एका वाहनाच्या काचा फुटल्या, तर आंदोलकांनी एका मालवाहू वाहनास आग लावली. दगडफेकीत जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह काही पोलीस जखमी झाले.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

हेही वाचा >>> Jalna Lathi Charge: सरकारच्या आदेशानेच जालन्यात लाठीमार नाना पटोले यांचा आरोप

पुण्यात मराठा समाज संघटनांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडविण्याऐवजी दडपशाही, हुकूमशाही करण्यात येत आहे. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता राज्यभरात मोठय़ा प्रमाणात आंदोलन, मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा पुण्यातील मराठा क्रांती मोर्चा आणि विविध मराठा समाजाच्या संघटनांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही मराठा समाज संघटनांनी संतप्त आंदोलने केली. कोल्हापूर शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, करवीर, चंदगड, शाहूवाडी, गिडग्लज तालुक्यातही निदर्शने करण्यात आली. सातारा जिल्ह्यात आंदोलनाचा सर्वाधिक फटका एसटी बसला बसल्याने प्रवाशांचे हाल झाले.

हेही वाचा >>> ‘एक फुल दोन हाफ’चे हे सरकार; उद्धव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला 

कराडमध्ये आंदोलकांनी वाहतूक रोखून घोषणाबाजी केली. प्रांत कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या प्रतिमांना जोडे मारले. सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी येथे ‘रास्ता रोको’ करण्यात आला. नगरमध्ये विविध राजकीय पक्ष, संघटनांनी लाठीमाराचा निषेध केला.

मराठवाडय़ात कडकडीत बंद

मराठवाडय़ात  काही ठिकाणी दगडफेक झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात शुक्रवारी रात्री बीड वळण रस्त्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध केला. काही बसवर दगडफेकही करण्यात आली. क्रांती चौक, सिडको भागात दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त होता. बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना या जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. धुळे-सोलापूर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेवराईतही आंदोलकांनी महामार्ग अडवून धरला. लातूर, नांदेड जिल्ह्यात बंद पाळून निषेध नोंदवण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाची एकही बस स्थानकातून बाहेर पडू शकली नाही. परभणी शहरात मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील बसची वाहतूक रोखून धरण्यात आली होती.

हेही वाचा >>> मराठवाडा अचानक कसा पेटला?

मराठवाडय़ात एसटी विस्कळीत

एसटीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ आगारांतील ४९० बस जागीच थांबून होत्या. आंदोलनाचे लोण पसरण्याची चिन्हे असल्याने ११०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. नगर, पुणे, पैठण, जालना आणि बीड मार्गावर धावणाऱ्या बसही जागीच थांबून होत्या. जालना जिल्ह्यात सर्वाधिक १६ एसटी बस जाळण्यात आल्या. त्यामुळे मराठवाडय़ातील राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक विस्कळीत होती. 

‘आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही’

मुंबई : मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे मराठा समाजाने वस्तुस्थिती जाणून घ्यावी, कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये आणि आंदोलनाच्या आगीवर राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन एका चित्रफीतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

‘न्यायालयीन चौकशी करा’

जालना : मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे केली. अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींची विचारपूस केल्यानंतर त्यांनी उपोषणस्थळी भेट घेतली. आंदोलन करणारे आणि अधिकाऱ्यांत चर्चा सुरू होती. परंतु कोठून तरी सूचना आल्या आणि पोलिसांनी लाठीमार सुरू केला, असे अनेकांनी सांगितले, असे पवार म्हणाले.

आंदोलकांच्या भावनेची कदर करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये. जाळपोळ, हिंसाचाराला खतपाणी घालू नये. अजित पवार, उपमुख्यमंत्री

बारसू येथील आंदोलकांवर आधी लाठीमार झाला. नंतर वारकऱ्यांवर आणि आता मराठा आंदोलकांवर. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

मराठा आरक्षण आंदोलकांवर सरकारच्या आदेशानेच अमानुष लाठीमार करण्यात आला. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपने हे कृत्य केले. – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस