लोकसत्ता वार्ताहर, जालना

Jalna Lathi Charge in Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू असताना जमलेल्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांवर झालेल्या दगडफेकप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १६ जणांसह अन्य ३०० ते ३५० नावे माहीत नसलेल्या आंदोलनकर्त्यांविरुद्ध गोंदी पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसले असताना प्रकृती खालावल्याने त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचविले होते. त्यामुळे त्यांना समजावून सांगण्यासाठी पोलीस अधिकारी गेले होते. परंतु आरक्षण मिळाल्याशिवाय जरंगे यांना उपोषण सोडू देणार नाही असे सांगून आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि महसूल अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. पोलीस आणि दंडाधिकारी यांनी दिलेल्या कायदेशीर सूचनांचे पालन केले नाही. पोलिसांवर दगडफेक व प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली तसेच त्यांचे खासगी वाहन पेटवून नुकसान केले, असे या संदर्भात दाखल केलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

आणखी वाचा-जालना लाठीमारानंतर पुणे-नगर, बीड-जालना, पैठण मार्गावरील बसच्या फेऱ्या रद्द

दरम्यान, शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीराजे यांनी आंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी उपस्थितांच्या समोर बोलताना ते म्हणाले, हे काय सुराज्य आहे? हे तर मोगल आणि निजामाचे राज्य आहे. १२ वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो, मराठ्यांवर गोळ्या घालायच्या असेल तर अगोदर माझ्यावर घाला. गोळ्या घालायला आंदोलनकर्ते काय पाकिस्तानी किंवा आतंकवादी आहेत? गुन्हे दाखल कशासाठी करता? दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या. लाठीमार आणि गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्यांचे निलंबन झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. गृहमंत्री म्हणतात, पोलिसांची चूक नाही. मग गोळ्या झाडणे बरोबर आहे का? हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. लाठीमार आणि गोळीबाराची कृती अमानुषीय असून या प्रकरणी स्पष्टीकरण मिळाले पाहिजे. कशा पद्धतीने मराठा समाजास आरक्षण देता हे सांगा. माझ्यासाठी समाजकारण प्रथम आणि राजकारण दुय्यम आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात एकाच पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. वर आणि खाली आपलेच सरकार आहे तर मग मराठा समाजास आरक्षण कधी मिळणार हे सांगा, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून केला.

आणखी वाचा-VIDEO: “माय-भगिनींच्या रक्तबंबाळ शिरावर…”; मराठा मोर्चावर लाठीचार्जनंतर मनसेची प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. ते म्हणाले, आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर गावांतून लोक येत होते. शांततेत चाललेले उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पोलिसांच्या लाठीमारात महिला, पुरुष व लहान मुले जखमी झाले. आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणे योग्य नाही. पोलिसांनी या प्रकरणी उगीचच अंधाधुंद गुन्हे दाखल करू नयेत. प्रशासन आणि पोलिसांमुळे हे प्रकरण चिघळले आहे. ही घटना माणुसकीला शोभणारी नाही. जालना येथे येत्या ८ सप्टेंबर रोजी राज्य शासनाचा ‘शासान आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार असल्याने प्रतिसाद मिळणाऱ्या या आंदोलनाचा त्यावर प्रभाव पडला असता किंवा अडचण आली असती, असेही सांगितले जात आहे. आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेला बळाचा वापर खालच्या पातळीवरील पोलीस करतील, असे वाटत नाही. वरच्या संदेशाशिवाय असा निर्णय घेतला जात नाही. बळाचा वापर करण्यासाठी गृहमंत्रालयाचा आदेश आला असावा, अशी शक्यताही रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.