औरंगाबाद महसूल आयुक्तालयाचे विभाजन झाल्यानंतर नांदेड व लातूरकर यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या साठी जनतेला हरकती व सूचना मांडायचा पर्याय उपलब्ध आहे. लातूरची पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर लातूरकरांची बाजू मांडेन, असे पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
खासदार सुनील गायकवाड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर व सुधाकर भालेराव, गणेश हाके, गोिवद केंद्रे आदी या वेळी उपस्थित होते. लातूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शुक्रवारी प्रथमच मुंडे लातुरात आल्या. जिल्हय़ातील पाणी, दुष्काळाची स्थिती, जलयुक्त शिवार योजना आदींबाबत अधिकाऱ्यांची आढावा बठक घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सरकार नवीन आहे. परिस्थिती व प्रश्न जुनेच आहेत. नव्या पद्धतीने हाताळणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुष्काळाचे नसíगक संकट अतिशय गंभीर असून शेतक ऱ्यांना केवळ पॅकेज देऊन भागणार नाही. सरकारचे कर्ज वाढेल व पुन्हा पुढच्या वर्षी पॅकेज देण्याची वेळ येईल. त्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास जलयुक्त शिवार अभियान राबवले जाणार असून, राज्यातील ५ हजार गावे व मराठवाडय़ातील १ हजार ५९१ गावे दुष्काळमुक्त करण्याची योजना सरकारने आखली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दिग्गजांनी महाराष्ट्राला चेहरा दिला. या दोन्ही जिल्हय़ांची पालकमंत्री म्हणून धुरा आपल्यावर असल्यामुळे त्याचे दडपण येत असल्याचेही त्यांनी मोकळेपणाने सांगितले. लोकांच्या अपेक्षा मोठय़ा आहेत. त्यांच्यासारखे काम करणे आम्हाला अतिशय अवघड आहे. लोकांना लळा लावणारी ती पिढी होती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
मुंडे अन् उशीर!
मुंडे अन् उशिराचे नाते पालकमंत्र्यांनी पहिल्याच बठकीत सिद्ध केले. दीड वाजताची पत्रकार परिषद पावणेतीन वाजता सुरू झाली. उशिराबद्दल मुंडे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी वेळेवर परळीहून निघाले. मात्र, पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात येत असल्यामुळे व लातुरात पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघाचे ऋणानुबंध असल्यामुळे लोकांच्या प्रेमामुळे उशीर झाला. आपल्याला पाहण्यास लोकांची गर्दी होती. त्या भावना अव्हेरून पुढे जाता येत नसल्यामुळेच उशीर झाला, असा खुलासा त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा