सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन्स लॉन्च होत आहेत. अनेक नवीन फीचर्ससह हे स्मार्टफोन्स लॉन्च केले जात आहेत. यातच भारतीय कंपनी असणाऱ्या LAVA कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन कोणता आहे याची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊयात.
Lava या भारतीय कंपनीने नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन Lava Yuva 2 Pro लॉन्च केला आहे. हा एक एंट्री लेव्हल फोन आहे आणि हा फोन अलीकडेच रिटेल स्टोअर्सवर ऑफलाईन पाहण्यात आला आहे. Lava Yuva Pro चे अपग्रेड व्हेरिएंट मागच्या वर्षी आले होते.
Lava Yuva 2 Pro चे फिचर्स
Lava Yuva 2 Pro या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा HD+ नॉच डिस्प्ले मिळणार आहे. याच्या स्क्रीनची डेन्सिटी ही 269 PPI इतकी आहे. तसेच यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळते. यायचे स्टोरेज २५६ जीबी इतके मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.Lava Yuva 2 Pro या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 ऑक्टा-कोर हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड 12 OS मध्ये येतो. स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, GPS, GPRS, 3G, Wi-Fi, Type-C, Bluetooth 5.1 आणि 3.5mm ऑडिओ जॅक सारखी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत.
Lava Yuva 2 Pro मध्ये वापरकर्त्यांना १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासाग दोन ड्युअल VGA कॅमेरा मिळणार आहेत. सेल्फी कॅमेरा हा ५ मेगापिक्सलचा आहे. यामध्ये फ्लॅशचे फिचर मिळते. तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस अनलॉक आणि बॅटरी सेव्हर मोड हे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. Lava Yuva 2 Pro मध्ये ५०००mAh ची बॅटरी आणि यासह १०w चा चार्जर येतो.
Lava Yuva 2 Pro ची किंमत
Lava Yuva 2 Pro च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ही ७,९९९ रुपये इतकी आहे. Lava ने अलीकडेच एडटेक प्लॅटफॉर्म Doubtnut सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. ९वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी Doubtnut च्या कोर्स मटेरिअलसाठी मोफत सबस्क्रिप्शनसह फोन प्री-लोड मध्ये येतो. या कोर्सची फी साधारणपणे १ वर्षासाठी १२,००० रुपये इतकी आहे.