मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्याच्या गृह खात्याने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीमधील चर्चेसंदर्भात माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने २००५ साली आदेश काढल्याने हा आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात लागू झाल्यास वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळी भूमिका संपुष्टात येईल असं सांगतानाच राज्य सरकार यासंदर्भात काहीही निर्णय घेणार नसल्याचं म्हटलंय. सध्या ज्या शासन आदेशानुसार भोंगे वापरले जातात हे कायम राहणार आहे असंही गृहमंत्री म्हणाले. मात्र त्याच वेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भातील मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली त्यावेळी गावाखेड्यांमधील किर्तन, काकड आरत्या आणि भजनसांसंदर्भातील मुद्दाही उपस्थित झाल्याचं म्हटलंय.
नक्की वाचा >> मशिदींवरील भोंग्यासंदर्भातील बैठकीशी आदित्य ठाकरेंचा काय संबंध?; गृहमंत्र्यांसोबत ते पत्रकार परिषदेला का उपस्थित होते?
मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात बोलताना गृहमंत्री गावांतील भजनं, किर्तनांसहीत नवरात्री, गणेशोत्सवाचाही उल्लेख करत म्हणाले, “सर्वांना…”
सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांसमोर भूमिका मांडताना गृहमंत्र्यांनी केला गावांमधील कार्यक्रमांचा उल्लेख
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in