राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची जीभ घसरली आहे. त्यांनी गलिच्छ भाषेत शरद पवारांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आम्ही संपवणार आहोत. त्यासाठी आम्ही उद्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि बैठका घेणार आहोत, असं गुणरत्न सदावर्ते यांनी जाहीर केलं आहे. पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आता हे नवीन काय आहे? म्हणे शरद पवारांना धमकी दिली आहे. पण त्यांना नेमकी धमकी कुणी दिली. शरद पवारांच्या काळातच दाऊद इब्राहिम उदयाला आला आहे. शरद पवारांचा जो वैचारिक व्हायरस आहे, तो व्हायरस आम्ही संपवणार आहोत. येणाऱ्या काही दिवसांत आम्ही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आणि त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेणार आहोत. ती रॅली उद्यापासून आम्ही काढणार आहोत.”

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत नथुराम गोडसेचा फोटो झळकवला आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोजवळ नथुराम गोडसेचा फोटो लावण्यात आला होता. यावेळी सदावर्ते यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसह जवळच्या खुर्चीवर ठेवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसेच्या फोटोही पुष्पहार अर्पण केला.