राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषणही केलं. आता मराठा समाजाच्या आरक्षणासाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केलं आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांसदर्भात लक्ष्मण हाके यांनी जनआक्रोश यात्रा सुरु केली आहे.

त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा तापला आहे. लक्ष्मण हाके यांनी आज जनआक्रोश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. “मनोज जरांगेंसाठी सरकारने लाडका आंदोलक योजना आणावी”, असा खोचक टोला लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना लगावला.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Raj Thackeray Supports WAQF Amendment bill
“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी
jayant patil
Jayant Patil : “राहुल नार्वेकरांनी गरम कॉफी दिली, मासे खाऊ घातले”, जयंत पाटलांनी सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती!

हेही वाचा : “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शाहांच्या टीकेवर अजित पवारांची दोन शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले…

लक्ष्मण हाके काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कारण २७ टक्के ओबीसी आरक्षणामध्ये ३.५ टक्के हिस्सा हा धनगर समाजाचा आहे. आज आमचे तरुण कुठेतरी शासकीय नोकऱ्यांमध्ये येऊ पाहत आहेत. पण या लोकांना कोणी सांगितलं की धनगर बांधव ओबीसी आरक्षणाच्या बाहेर आहेत. हे फक्त आरक्षणाचे कप्पे आहेत. त्यामुळे जर मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर २७ टक्क्यांची चौकट राहणार नाही”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

“मराठा समाजाच्या ओबीसीमध्ये येण्याच्या मागणीविरोधात आम्ही छातीची ढाल करून पुढे येत आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्यात बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करु नका. ओबीसींचं हे आंदोलन उभं राहत आहे. या आंदोलनाला तोडा आणि फोडा अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासांठी महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये एक टक्क्याचंही बजेट मिळत नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगावं. एक टक्का बजेट मिळत नसेल तर मग ओबीसींचं सामाजिक पर्रिवर्तन कसं होणार?”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला

“सध्या राज्य सरकारच्या अनेक योजना येत आहेत. सरकारच्या काय योजना आहेत? लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना. आता आमच्या मनोज जरांगे यांच्यासाठी लाडका आंदोलक योजना सरकारने आणावी”, असा खोचक टोला लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.

Story img Loader