Laxman Hake Criticize Manoj Jarange Patil : “महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या”, असा दावा ओबीसी आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच मविआच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मविआपुरस्कृत का म्हणू नये? असा प्रश्नही हाके यांनी उपस्थित केला आहे. हाके म्हणाले, “नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक ठिकाणी बैठका घेतल्या. परभणी, जालना, बीड या भागात त्यांनी मविआच्या उमेदवारांचा प्रचार केला, महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधातही प्रचार केला. महायुतीचे उमेदवार असे पाडा की यांच्या पुढच्या पाच पिढ्या निवडून आल्या नाही पाहिजेत, अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं होतं. हे वक्तव्य पाहता आम्ही मनोज जरांगे यांना महाविकास आघाडी पुरस्कृत का म्हणू नये?”

लक्ष्मण हाके म्हणाले, “मराठवाड्यातील सर्व खासदारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. परंतु, त्याच खासदारांनी ओबीसी आंदोलनाविषयी चकार शब्द देखील काढला नव्हता. हे लोक आमचं अस्तित्व मान्य करत नाहीत, याची मला खंत वाटते.”

devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Prakash Ambedkar slams Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar: “मनोज जरांगे पाटील यांनीच भाजपाला…”, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा आरोप; म्हणाले…
loksatta readers response
लोकमानस : आज भेदाभेद-भ्रमसुद्धा मंगल!
Bachchu Kadu On Uddhav Thackeray Sharad Pawar
Bachchu Kadu : ‘उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष लवकरच…’, बड्या नेत्याचा दावा; म्हणाले, “राजकीय उलथापालथ…”
dilip walse patil remarks on dhananjay munde resignation
वळसे पाटलांकडून मुंडेंची पाठराखण; मुंडेंच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याची भूमिका
Vinayak Raut On Shinde Group Ajit Pawar Group
Vinayak Raut : “शिंदे गट आणि अजित पवार गटाला लवकरच…”, ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी मध्यस्थी करावी, यासाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरही लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. हाके म्हणाले, “शरद पवारांना आम्हा अठरापगड जातीच्या लोकांची वेदना दिसली नाही. त्यामुळे त्यांनी अद्याप ओबीसी आरक्षणाबाबत कुठलीही भूमिका घेतली नाही, त्याबद्दल मला वाईट वाटतं. शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत. मात्र त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांना प्राधान्य दिलं. त्यांच्या पक्षाने एकूण १० उमेदवार उभे केले होते, त्यापैकी सात उमेदवार मराठा होते. याचा अर्थ त्यांनीही इतर जातीच्या उमेदवारांना संधी दिली नाही. याबद्दल मला खेद वाटतो.”

Laxman Hake on Maratha and OBC reservation

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : “महायुतीचं नुकसान होईल असं…”, भुजबळ-शरद पवार भेटीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार हे पुरोगामी नेते आहेत. ते नेहमी फुले, शाहू, आंबेडकरांची भाषा बोलत असतात. परंतु, तेच शरद पवार आम्हाला संधी देत नसतील, अठरापगड जातीच्या कार्यकर्त्यांना संधी देत नसतील, आमचं प्रतिनिधित्व मान्य करत नसतील तर ते चुकीचं आहे. छगन भुजबळ व शरद पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत या नेत्यांनी ओबीसींच्या वेदना जाणून घ्यायला हव्यात. या मोठ्या माणसांनी मुरब्बी, जाणतेपनाची, घटनात्मक व कायदेशीर भूमिका घ्यावी. या माणसांनी पुढे यावं आणि राज्यातलं वातावरण सुरळीत करावं.

Story img Loader