Laxman Hake Criticize Manoj Jarange Patil : “महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक बैठका घेतल्या होत्या”, असा दावा ओबीसी आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच मविआच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मविआपुरस्कृत का म्हणू नये? असा प्रश्नही हाके यांनी उपस्थित केला आहे. हाके म्हणाले, “नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक ठिकाणी बैठका घेतल्या. परभणी, जालना, बीड या भागात त्यांनी मविआच्या उमेदवारांचा प्रचार केला, महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधातही प्रचार केला. महायुतीचे उमेदवार असे पाडा की यांच्या पुढच्या पाच पिढ्या निवडून आल्या नाही पाहिजेत, अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं होतं. हे वक्तव्य पाहता आम्ही मनोज जरांगे यांना महाविकास आघाडी पुरस्कृत का म्हणू नये?”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा