Laxman Hake News : महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यामुळे ते वादात अडकले आहेत. मराठा समाज आणि ओबीसी समाज अशा दोन्ही समाजांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी तर राज ठाकरे तुम्ही प्रबोधनकारांच्या घराण्याचे आहात का असा बोचरा प्रश्न विचारला आहे.

राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांचा गोंधळ

राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जेव्हा आरक्षणाची गरज नाही असं विधान केलं त्यानंतर राज ठाकरे धाराशिव या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये सोमवारी मराठा आंदोलकांनी बराच राडा घातला होता. अखेर राज ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना शांत केलं. मनोज जरांगेंनीही राज ठाकरेंवर टीका केली. त्या पाठोपाठ आता लक्ष्मण हाकेंनीही ( Laxman Hake ) राज ठाकरेंवर टीका केली आहे.

Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”

राज ठाकरे काय म्हणाले होते? मनोज जरांगेंचं उत्तर काय?

“महाराष्ट्रात एवढ्या सर्व गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंवर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, त्यांच्यावर आम्ही काही बोलतही नाही”, अशी खोचक टीका करत मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं. या पाठोपाठ लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी मला राज ठाकरेंच्या विचारांची कीव येते असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- Raj Thackeray: “हे सगळं शरद पवारांना…”; राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

लक्ष्मण हाके काय म्हणाले?

“राज ठाकरे यांच्या आरक्षणाबाबतच्या विचारांची मला कीव येते. राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवायला मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का? राज ठाकरे तुम्ही खरंच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का?” असा संतप्त सवाल लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवारांबाबत काय म्हणाले लक्ष्मण हाके?

शरद पवार हे नेहमी इलेक्शन मोडमध्ये असतात. ओबीसी समाजाचं व्याकरण ते समजतात, पण त्यांचं अंत:करण समजत नाही. ते समजले असते तर शरद पवार आतापर्यंत दोन-तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते. जरांगे म्हणजे पवार आणि पवार म्हणजे मुख्यमंत्री हे झालंय. पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीत ही हेच असेल. मराठ्यांनी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर जायला हवे. मुख्यमंत्र्‍यांनी ओबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका घेतली आहे? ओबीसी संघटित आहेत, तो पुढेही संघटित होईल. १८ ऑगस्टला नांदेड आणि १९ ऑगस्टला सांगलीत ओबीसी मेळावा आहे. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री ओबीसीच असेल, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

Story img Loader