आश्रम शाळेतील महिलांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार असणारे माजी आमदार लक्ष्मण माने सोमवारी दुपारी साताऱयातील पोलिसांपुढे शरण आले. माने यांनी त्वरित पोलिसांना शरण जावे व आपली भूमिका मांडावी, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर लगेचच माने पोलिसांपुढे शरण आले आहेत.
माने यांच्याविरोधात आतापर्यंत सहा महिलांनी साताऱ्याच्या पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. यापैकी पाच महिला माने यांच्या शारदाबाई पवार आश्रमशाळेतील महिला कर्मचारी आहेत. या तक्रारींआधारे माने यांच्याविरोधात बलात्काराचे गुन्हे सातारा पोलिसांनी दाखल केले आहेत.
माने आणि त्यांना मदत करणाऱ्या मनीषा गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी सातारा जिल्हा न्यायालयाने अगोदरच फेटाळला आहे. त्यानंतरही गेल्या १५ दिवसांपासून माने फरार होते.
लक्ष्मण मानेंविरोधात आणखी एक तक्रार
मानेंनी पोलिसांना शरण जावे – शरद पवार
अखेर लक्ष्मण माने पोलिसांपुढे शरण
आश्रम शाळेतील महिलांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार असणारे माजी आमदार लक्ष्मण माने सोमवारी दुपारी साताऱयातील पोलिसांपुढे शरण आले.
Written by badmin2
आणखी वाचा
First published on: 08-04-2013 at 04:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman mane appear before satara police in rape case