आश्रम शाळेतील महिलांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार असणारे माजी आमदार लक्ष्मण माने सोमवारी दुपारी साताऱयातील पोलिसांपुढे शरण आले. माने यांनी त्वरित पोलिसांना शरण जावे व आपली भूमिका मांडावी, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर लगेचच माने पोलिसांपुढे शरण आले आहेत. 
माने यांच्याविरोधात आतापर्यंत सहा महिलांनी साताऱ्याच्या पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. यापैकी पाच महिला माने यांच्या शारदाबाई पवार आश्रमशाळेतील महिला कर्मचारी आहेत. या तक्रारींआधारे माने यांच्याविरोधात बलात्काराचे गुन्हे सातारा पोलिसांनी दाखल केले आहेत.
माने आणि त्यांना मदत करणाऱ्या मनीषा गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी सातारा जिल्हा न्यायालयाने अगोदरच फेटाळला आहे. त्यानंतरही गेल्या १५ दिवसांपासून माने फरार होते.
लक्ष्मण मानेंविरोधात आणखी एक तक्रार
मानेंनी पोलिसांना शरण जावे – शरद पवार 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा