आश्रमशाळेतील महिलांवरील लैंगिक छळाच्या गुन्ह्य़ाबद्दल पोलिसांना गेले पंधरा दिवस गुंगारा देणारे माजी आमदार लक्ष्मण माने सोमवारी पोलिसांना शरण आले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दरम्यान, माने यांना अटक होत असतानाच त्यांच्याविरुद्ध आणखी एका महिलेने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे.  यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलांची संख्या आता सात झाली आहे.
माजी आमदार लक्ष्मण माने कार्याध्यक्ष असलेल्या शारदाबाई पवार आश्रमशाळेतील या महिलांनी त्यांच्याविरुद्ध लैंगिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या महिला पददलित असून, नोकरी टिकवण्याच्या दबावातून मानेंनी त्यांच्यावर २००३ ते २०१० पर्यंत अत्याचार केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. लैंगिक छळाचे हे गुन्हे दाखल झाल्यानंतर गेले पंधरा दिवस माने बेपत्ता होते. विविध पक्ष, महिला संघटना, दलित चळवळीतील कार्यकर्ते यांनी मानेंच्या अटकेची व त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केल्यानंतरही मानेंना पडकण्यात पोलिसांना यश येत नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा