लैंगिक छळप्रकरणात अटकेत असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माने यांना दिलेली ही कोठडी केवळ बलात्काराच्या एकाच गुन्ह्य़ाबद्दल आहे. माने यांच्याविरुद्ध सहा महिलांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार सातारा पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे. या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध सहा स्वतंत्र बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ांपैकी एका गुन्ह्य़ात त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य प्रत्येक गुन्ह्य़ात पोलीस त्यांना स्वतंत्ररीत्या अटक करणार असून त्यानुसार स्वतंत्र पोलीस कोठडीची मागणी करणार आहे. दरम्यान या घटनेतील पोलिसांना हव्या असलेल्या मनीषा गुरव यांचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in