आश्रम शाळेतील महिलांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार असणारे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी पोलिसांना त्वरित शरण जावे व आपली भूमिका मांडावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी येथे रविवारी केली. माने दोन आठवडे फरारी असून, त्यांच्यासंबंधी पवारांनी प्रथमच जाहीर वक्तव्य केले आहे.
माने यांच्याविरोधात आतापर्यंत सहा महिलांनी साताऱ्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापैकी पाच महिला माने यांच्या शारदाबाई पवार आश्रमशाळेतील महिला कर्मचारी आहेत. या तक्रारींआधारे माने यांच्याविरोधात बलात्काराचे गुन्हे सातारा पोलिसांनी दाखल केले आहेत. माने यांचा ठावठिकाणा पोलिसांना अद्याप लागलेला नसून, पोलिसांनी तपासासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडून १० एप्रिलपर्यंत मुदत मागून घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा विचार व्यर्थ आहे. तसा काही पर्याय मला शक्य दिसत नाही, असे स्पष्ट मत पवार शरद पवार यांनी व्यक्त केले. सावंगी येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यानंतर मेघे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी काही प्रश्नांना उत्तरे दिली.

Story img Loader