एलबीटी कराचा भरणा करण्यासाठी ऑगस्टपर्यंत चार हप्त्याची मुदत देण्यावर तडजोड झाल्याने व्यापाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले. खा. संजयकाका पाटील, काँग्रेसचे नेते मदन पाटील, महापौर विवेक कांबळे यांच्या उपस्थितीत व्यापारी प्रतिनिधींची बोलणी झाल्यानंतर हा तोडगा काढण्यात आला.
     एलबीटी कराच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने टोकाची भूमिका घेतल्यानंतर व्यापारी संघटनेने आंदोलन सुरू केले होते. शनिवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. व्यापारी प्रतिनिधी आणि संजयकाका पाटील यांची बठक प्रथम झाली. यावेळी तोडगा सन्मान्य असावा अशी भूमिका व्यापारी प्रतिनिधींनी घेतली. एलबीटी लागू केल्यापासून सांगलीत व्यापारी संघटनेने कराला विरोध केला असून वेळोवेळी आंदोलन करीत कर भरण्यास नकार दिला होता.
    राज्य शासनानेही एलबीटी ऑगस्टपर्यंत कायम राहील अशी भूमिका घेतल्याने व्यापाऱ्यांनीही दोन पावले माघार घेण्याची तयारी दर्शवली. यानुसार आतापर्यंत थकित असणारा कर भरण्याची तयारी दर्शवली. मात्र यावरील दंड व व्याज आकारणी शासन निर्णयावर अवलंबून राहणार आहे. तो महापालिका व व्यापाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. थकित करापकी २५ टक्के रक्कम मार्चपर्यंत व उर्वरित रक्कम ऑगस्टपर्यंत समान तीन हप्त्यात भरण्यावर एकमत झाले. यामुळे गेले दोन वष्रे व्यापारी व महापालिका यांच्यातील वाद संपुष्टात आला.

Story img Loader