रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे आयोजित मुक्तरंग व्याख्यानमालेचे उद्घाटन ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते आज (१४ डिसेंबर) संध्याकाळी होणार आहे. वाचनालयाच्या सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून या प्रसंगी ‘भारतीय राजकारण व अर्थकारण’ या विषयावर कुबेर यांचे व्याख्यान होणार आहे. त्याचप्रमाणे येत्या सोमवारी (१७ डिसेंबर) संध्याकाळी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांचे ‘माझा लेखनप्रवास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
व्याख्यानमालेनिमित्त अंजनी प्रकाशतर्फे वाचनालयाच्या आवारात ग्रंथप्रदर्शन आणि सवलतीने विक्रीही आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते आज झाले.

Story img Loader