Maharashtra Legislative Council Election Live: राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. पण, विधान परिषदेत काहीही होऊ शकते, हे साऱ्याच पक्षांचे नेते सूचित करीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते)
शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी– प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (२८ मते)
काँग्रेस -भाई जगताप (२६ मते), चंद्रकांत हंडोरे (पराभूत – २२ मते)
विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरस होणार होती. मात्र दोन्ही उमेदवार निवडून आले असून काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
काँग्रसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २२ मते, तर भाई जगताप यांना १९ मते मिळाली आहेत. काँग्रेसकडे एकूण ४४ मते असून देखील दोघांच्या मतांची बेरीज कमी भरत आहे. भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मतं मिळाली आहेत.
राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी- सचिन अहिर, आमशा पाडवी
भाजपाचे विजयी उमेदवार- प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे. त्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. यातील सर्वच आमदारांची मतं वैध ठरली आहेत. यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या पसंतीची मतं आधी मोजली जाणार आहेत.
२ तासानंतर अखेर मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात निकाल हाती येणार, राष्ट्रवादीकडून राजेश टोपे, शिवसेनेकडून अरविंद सावंत हजर
लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावरही आक्षेप, मविआ आणि भाजपामध्ये आरोपांच्या फैरी, निकाल लांबणीवर
https://twitter.com/LoksattaLive/status/1538857776478228480
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांनी भाजपाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी १७० आमदार असणारे पहाटेपर्यंत जागे का जागे होते? असा सवाल केला. ते सोमवारी (२० जून) विधीमंडळात मतदानानंतर पत्रकारांशी बोलत होते.
भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी स्वतः मतदान न करता दुसऱ्याकडून मतदान करून घेतले. त्यानंतर काँग्रेसने मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अपक्ष आमदार व महाविकासआघाडीचे असंतुष्ट आमदारांनी या सरकारला राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत धक्का देण्याची सूचना केली. म्हणून भाजपाने या नियोजनाच्या आधारावर, सहकार्याच्या आश्वासनावर पाचवा उमेदवार उभा केला आहे. आम्हाला विश्वास आहे की राज्यसभेप्रमाणे याही निवडणुकीत भाजपाचे सर्व उमेदवार विजयी होतील.”
https://twitter.com/LoksattaLive/status/1538816554413936643
विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकारणाचा पारा चढला आहे. एकीकडे महाविकासआघाडीचे नेते आपल्या सर्व जागा निवडून येणार असल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही आमचेच सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा भाजपाकडून होतोय. अशातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज कुणीही पावसात भिजलं तरी निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असं म्हणत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला. ते सोमवारी (२० जून) मतदानानंतर विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
अपक्ष आमदार संजय शिंदे म्हणाले, “राज्यसभेत मत फुटल्याच्या आरोपाचा विषय संपला आहे. आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत महाविकासआघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून येतील. कालपासून सर्व नेते मंडळींच्या चर्चा झाल्यात. त्यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. माझी कोणतीही नाराजी नाही. मी मविआच्या बाजूनेच आहे. राज्यसभेत संजय राऊत यांचा गैरसमज झाला होता, नंतर त्यांनी त्यांचं मत दुरुस्त केलं होतं. ते महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांचा गैरसमज असेल तर त्यांना भेटून चर्चा करेन.”
कल्याण : राज्य सभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील खूप चर्चेत आले होते. त्यांचे मत भाजपाला गेल्याची खूप चर्चा होती. विधान परिषद निवडणुकीबाबत राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत सस्पेन्स निर्माण केला आहे.
राजू पाटील म्हणाले, “भाजपाला मतदान करणार आहोत की दुसऱ्या पक्षाला याबाबत कोणी गृहित धरू नये, असा सूचक इशारा त्यांनी दिला. लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. एका मताला किती महत्व असतं हे तुम्ही पाहिलं आहे. राज ठाकरे यांनी निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे मतदान होईल.”
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत. असे असताना राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान संजय राऊत यांनी ज्यांच्यावर शंका उपस्थित केली होती ते अपक्ष आमदार संजयमामा शिंदे कोणाला मतदान करणार असे विचारले जात होते. याच प्रश्नाचे उत्तर खुद्द संजयमामा शिंदे यांनी दिले असून संजय राऊतांनी जे वक्तव्य केले होते, तो विषय संपला आहे. माझे मत महाविकास आघाडीलाच असेल असे संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर
रवी राणा म्हणाले, “महाविकासआघाडीला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जातोय. दबाव टाकण्यासाठी वॉरंट काढलं जात आहे.”
“संजय राऊत म्हणाले रवी राणा आमच्या पायापाशी येईन. एक लक्षात ठेवा ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांना तुम्ही धोका दिला आहे. तुम्हाला जनता पायाशी घेईन. लोकांना तुम्ही खोटी आश्वासनं दिली, दिशाभूल केली,” असं म्हणत राणांनी राऊतांवर हल्ला चढवला.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर आम्ही कोणाचा गेम करत नाही, असं वक्तव्य केलं. तसेच भाजपाचा पाचवा उमेदवार देखील निवडून येईल, असा दावा केला. यावेळी त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंवरही भाष्य करत टोला लगावला. ते सोमवारी (२० जून) मुंबईत विधानभवनात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
अकोला : “विधान परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला, तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. भाजपाचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. अकोल्यात एका विवाह समारंभात आले असताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अकोला महापालिकेसह राज्यातील आगामी महापालिका निवडणूका लढणार असल्याचीही घोषणा केली.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मागितली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत या दोघांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलांनी याबाबत तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी १२ वाजता सुनावणी होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. मतदानाला काही तास शिल्लक राहिलेले असताना मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांतील एका पक्षाचा उमेदवार पराभूत होणार असे भाकित भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच संबंध, संवाद हा बाजारात विकत घेता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना ते कमावलेलं आहे, असा टोलादेखील त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. ते आज सकाळी पत्रकारांशी बोलत होते. वाचा सविस्तर
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत आमचेच सहा उमेदवार निवडून येणार असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. तर दुसरीकडे शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेनेच्या याच नाराजीवर काँग्रेस नेते तथा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर
विधा परिषद निवडणूक चुरशीची होणार असली तरी आमचा विजय होणार असं महाविकास आघाडीकडून म्हटलं जात आहे. दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जात असताना भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सूचक ट्वीट केले आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे थेट नाव न घेता या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याबद्दल भाकित केलं आहे. वाचा सविस्तर
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी विधान भवनात मतदान सुरु आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत. काहीही झाले तरी या निवडणुकीत आमचेच उमेदवार निवडून येणार असा दावा प्रत्येकाकडूनच केला जातोय. असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. आमदार आपापल्या पक्षाच्या कँपमध्ये असतानादेखील दबाव, धमक्यांचे निरोप येत होते. आमच्या समोरसुद्धा हे घडले आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. वाचा सविस्तर
महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत आज चुरशीची लढत होणार असल्याचं चिन्हं दिसत आहेत. दोन्ही बाजूंकडून प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. आपला उमेदवार निवडून यावा म्हणून प्रत्येक मताचं योग्य गणित बसवण्याचे नियोजन राजकीय पक्षांनी केलं आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्यानेच पक्ष आदेशानुसार आपण मतदानासाठी जात असल्याचं भाजपाच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. असं असतानाच आजच्या ‘सामना’ अग्रलेखामधून शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा सर्व मार्गांनी केवळ विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असून यामध्ये अगदी सरकारी यंत्रणा, स्वत:च्या आजारी आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीत मतदानास उचलून आणण्यासारखे प्रकार करत असल्याची टीका शिवसेनेनं केलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.
भाजपा अतीआत्मविश्वास दाखवत असून राज्यसभेला केलेली चूक आम्ही यंदा करणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रहित पवार यांनी व्यक्त केलाय. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानभवनामध्ये मतदानासाठी हजर झालेल्या रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यसभेच्या वेळेस केलेली चूक यावेळेस करणार नाही याबद्दल महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी आणि नेत्यांनी काळजी घेतल्याचं सांगितलं. याचवेळेस बोलताना रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनची आठवण करुन देत त्यांना अतीविश्वास वाटतोय असा टोलाही लगावला. येथे वाचा सविस्तर वृत्त.
https://twitter.com/LoksattaLive/status/1538747771532222464
पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक या गंभीर आजारी असूनही, आपल्या पक्षासाठी मतदान करण्यास पुण्यावरून कुटुंबीयांसह निघून आता विधानभवनात दाखल झाल्या आहेत.