शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आज ( १० ऑगस्ट ) मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महत्वाचे ७ निर्णय घेण्यात आले आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आणि सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयांना मंजुरी देण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते, अशी माहिती सीएमओ ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीत कुठले निर्णय घेण्यात आले?
- राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. ( महिला आणि बालविकास विभाग )
- सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. ( जलसंपदा विभाग )
- सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये ( विधी आणि न्याय विभाग )
- पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. ( महसूल विभाग )
- फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार ( परिवहन विभाग )
- भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन ( महसूल आणि वन विभाग )
- विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता. ( उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग )
First published on: 10-10-2023 at 15:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lek ladki yojana maharashtra cabinet meeting shinde fadnavis pawar govt scheme ssa