गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील शिंदिपार येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे. शनिवारी रात्री बिबट्या संबंधित शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरला होता. यावेळी बिबट्याने पाच शेळ्यांसह गोठ्यातील कोंबड्याही फस्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुरेश शंकर कापगते असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोठ्याच्या खिडकीतून आत शिरलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. शेळ्यांचा आवाज ऐकून कापगते गोठ्यात आले. यावेळी बिबट्याने त्यांच्यावर देखील हल्ला केला. मात्र, त्यांनी वेळीच दार बंद केल्या मोठा अनर्थ टळला. वनविभागाने रविवारी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याला जेरबंद केले. यापूर्वी सौंदड परिसरात याच बिबट्याने हैदोस घातला होता.