तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारात झोपेत असलेल्या एका चिमुरडीला बिबटय़ाने उचलून नेले. आज पहाटे झालेल्या या हल्ल्यात संबंधित चारवर्षीय मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, घडलेल्या घटनेने परिसरात बिबटय़ाच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.
रेखा लक्ष्मण जाधव असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे मूळ रहिवासी असलेले लक्ष्मण जाधव कामधंद्यानिमित्त तालुक्यातील बोटा येथे वास्तव्याला असतात. बुधवारी ते पत्नी व दोन मुलांसह धांदरफळ येथे राहणा-या नेतेवाइकांकडे आले होते. येथील ठाकरवस्तीत रात्री नातेवाइकांच्या छपरासमोरील ओटय़ावर सगळे झोपले होते. पहाटेच्या सुमारास आईजवळ झोपलेल्या रेखाला बिबटय़ाने अलगद उालून नेले, याचा थांगपत्ताही तिच्या आईला लागला नाही. मुलीच्या जिवाच्या आकांताने ओरडण्याच्या आवाजाने बाजूच्या झोपडय़ातील लोक जागे झाले. दरम्यान, सगळी वस्ती जागी होऊन आरडाओरडा करू लागली. बिबटय़ाने शेजारच्या शेतात जाऊन मुलीला आपले भक्ष्य बनवले होते. शोध घेणारे लोक त्या ठिकाणी पोचले. समोर बिबटय़ाच्या तोंडात मुलगी दिसत असतानाही घाबरलेले लोक पाहण्यापलीकडे काहीच करू शकले नाहीत. तास-दीड तास बिबटय़ा आरामात तेथे पहुडला होता. सकाळी काही गावकरी, पोलीस, वन विभागाचे कर्मचारी यांनी त्या ठिकाणी जाऊन छिन्नविच्छिन्न अवस्थेतील रेखाचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
छोटय़ा मुलीला बिबटय़ाने केले भक्ष्य
आज पहाटे झालेल्या बिबटय़ाच्या हल्ल्यात चारवर्षीय मुलीचा मृत्यू
Written by अपर्णा देगावकर
![संग्रहित छायाचित्र](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/07/leopard1.jpg?w=1024)
First published on: 25-09-2015 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard attacks on small girl