रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावडेवाडी नंबर २ जवळ किरण रघुनाथ साळवी यांच्या फार्म हाऊस येथील विहिरीतील पाण्यात भक्ष्याचे शोधात आलेला बिबट्याचा बछडा पडला. त्याला वनविभागाच्या कर्मचारी, पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र दुस-यांदा बिबट्याचा बछडा भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरल्याने भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.

किरण रघुनाथ साळवी यांच्या फार्म हाऊस मधील विहिरीत पडलेला बिबट्याचा बछडा प्रथम फार्म हाऊसची देखभाल करणारे घाणेकर यांनी पाहीला. याविषयीची माहिती त्यांनी विनय मुकादम, सुभाष मालप आणि निवळी गावचे उपसरपंच संजय निवळकर यांना दिली. त्यावेळी उपसरपंच निवळकर यांनी पाहणी करून याची माहिती ग्रामीण पोलीस ठाणे व वनविभागाला दिली. याठिकाणी तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी यादव, बिट अंमलदार कोकरे, भिसे तसेच वनविभागाचे अधिकारी गावडे, राजेंद्र पाटील, कदम हे हजर झाले.

Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Nagpur, mango tree , Bhonsale period ,
भोसलेकालीन ‘आमराई’ ओसाड होण्याच्या मार्गावर!
Who are the Bahelia hunters on the trail of tigers in Maharashtra Why are tigers in danger from them
महाराष्ट्रातील वाघांच्या मागावर आहेत बहेलिया शिकारी! कोण आहेत बहेलिया? त्यांच्यापासून वाघांना मोठा धोका का?
Cowherd died , tiger attack, Chandrapur,
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !

आणखी वाचा-अल्पवयीन मुलीला बोटीवर नेऊन अत्याचार; रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एका पिंजऱ्याच्या साह्याने व ग्रामस्थांच्या मदतीने वनविभाग व पोलिसांनी बिबट्याच्या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. शुक्रवार २८ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ ते १० वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या बछड्याला पिंजऱ्यात कैद करून विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र निवळी गावात हा प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने रानटी प्राणी आता मानवी वस्तीत येऊ लागल्याने भितिचे वातावरण तयार झाले आहे.

Story img Loader