मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका कारच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील डहाणू तालुक्यातील आंबोली या गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात करमधील दोन जण जखमी झाले आहेत.

गुजरातकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीने रस्ता पार करणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली. अपघातात ठार झालेला बिबट्या मादी जातीचा आहे. हा बिबट्या सुमारे चार वर्षांचा असावा असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महामार्गावरून रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला स्विफ्ट डिझायर कारची जोरदार धडक बसली. या धडकेत बिबट्या तिथेच कोसळला. यानंतर घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Story img Loader