नाशिकमध्ये बिबट्याने एका वस्तीत शिरुन पाळीव कुत्र्यावर हल्ला करत ठार केलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ट्विटरला २० हजारांहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी कुत्रा अंगणात कठड्यावर बसल्याचं दिसत आहे. यानंतर काही सेकंदात तिथे बिबट्या येतो. बिबट्या आल्याचं पाहताच कुत्रा त्याच्यावर भुंकत पळण्याचा प्रयत्न करतो. यावेळी बिबट्या काही वेळासाठी मागे जातो आणि कुत्रा अंगणात येताच त्याच्यावर हल्ला करतो. काही वेळाने बिबट्या कुत्र्याची शिकार करुन त्याला जबड्यात पकडून पळून जाताना दिसत आहे.

नाशिकचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. “बिबट्याची हालचाल वाढली असून रात्रीच्या वेळी गावकऱ्यांनी बाहेर पडू नये असं आमचं आवाहन आहे. लोकांनी घरातच थांबावं आणि सतर्क राहावं,” असं पंकज गर्ग यांनी सांगितलं आहे.

बिबट्याने रहिवासी वस्तीत घुसखोरी करण्याच्या घटना नाशिकमध्ये नेहमी घडत असतात. याचवर्षी जानेवारी महिन्यात नाशिक शहरातील एका निवासी भागातून एका बिबट्याची सुटका करण्यात आली होती. ८ तास हे बचावकार्य सुरु होतं. या घटनेत एका व्यक्तीवर हल्ला झाला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard entered a residential area in mungsare village of nashik attacked a pet dog sgy
Show comments