सावंतवाडी : शिकारीसाठी लावलेल्या फासकीत एक बिबट्या अडकला. त्याला वन विभागाने फासकीतून मुक्त केले,मात्र तो मृत्यू पावला. दरम्यान अज्ञात व्यक्ती विरोधात वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दोडामार्ग तालुक्यात केर येथे सकाळी एक बिबट्या एका झाडीत फासकीत अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली, तात्काळ वनविभाग या ठिकाणी पोहचला व त्या बिबट्याची सुटका केली मात्र त्या नंतर काही क्षणात बिबट्याचा मृत्यू झाला.

आज शनिवारी  सकाळी दोडामार्ग तालुक्यातील केर येथे एक लहान बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली, दोडामार्ग वनविभागाच्या वनाधिकारी वैशाली मंडल यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे अधिकारी यांनी या ठिकाणी पोहचून पाहणी केली असता सदरचा बिबट्या हा अज्ञाताने शिकारी साठी लावलेल्या फासकीत अडकला असल्याचे दिसले. वनविभागाने मोठ्या शिताफिने सदरच्या बिबट्याची त्या फासकीतून सुटका करत त्याला जेरबंद केले. मात्र काही क्षणात त्या बिबट्याचा मृत्यू झाला, सदरचा बिबट्या रात्री उशिरा या फासकीत अडकला असावा , असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Story img Loader