बिबट्याने एखाद्या जनावराची शिकार केल्याचं तुम्ही आतापर्यंत पाहिलं किंवा ऐकलं असेल. पण एखाद्या गाईने किंवा गायींनी बिबट्याची शिकार केल्याचं तुम्ही ऐकलंय का ? नक्कीच नसेल. पण संगमनेर येथे 30 ते 35 गायींनी मिळून दीड वर्षाच्या नरबिबट्याची शिकार केल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्या गोठ्यात घुसला होता. मात्र यावेळी त्यालाच आपले प्राण गमवावे लागले. संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी परिसरात सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या घराजवळ मुक्त गोठा आहे. या गोठ्यात 30 ते 35 जनावरे आहेत. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात एका बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला. बिबट्या शिरलेला पाहून सुरक्षेसाठी गायी सैरावैरा पळत सुटल्या. यावेळी गायींच्या पायाखाली तुडवलं गेल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

गायींनी हंबरडा फोडल्याने उंबरकर कुटुंबीयांनी गोठ्याकडे धाव घेतली. यावेळी एका बिबट्याला गायींनी पायाखाली तुडवला असल्याचं त्यांनी पाहिलं. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी बाहेर उभ्या असणाऱ्या एका बिबट्याने तेथून पळ काढला. उंबरकर कुटुंबाने तात्काळ वनविभागाला यासंबंधी माहिती. वनविभागाने घटनास्थळी जाऊन पाहिलं असता नरबिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचं त्यांनी पाहिलं.