दुर्मिळ पट्टेरी वाघाची दोन कातडी सांगलीत हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी नाशिक येथे बिबटय़ाचे एक कातडे हस्तगत करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला अटक केली आहे. हे बिबटय़ाचे कातडे तीन महिन्यांपूर्वी सांगलीहून विक्रीसाठी निफाड तालुक्यातील (जि. नाशिक) वनसगाव येथे पाठविण्यात आले होते.
वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला सांगली पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बिबटय़ाचे कातडे नाशिक येथील वनसगाव येथे विक्रीस दिले होते. सांगली पोलिसांच्या पथकाने लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वनसगाव येथे छापा टाकून प्रल्हाद सुभाष शिंदे (ता. निफाड) या अटक केली. त्याच्याकडून बिबटय़ाचे कातडे हस्तगत करण्यात आले आहे.
वाघापाठोपाठ बिबटय़ाचे कातडे हस्तगत
दुर्मिळ पट्टेरी वाघाची दोन कातडी सांगलीत हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी नाशिक येथे बिबटय़ाचे एक कातडे हस्तगत करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला अटक केली आहे.
First published on: 19-03-2014 at 03:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard skin seized after tiger